भारतीय लोकांवर खुप मोठया प्रमाणावर रामायणाचा प्रभाव आहे .राम आणि रावणाबदल अनेक कथा पुराणात आढळतात . रामायणातील अनेक घटनांबद्दल आज देखील मोठया प्रमाणावर लोकांना आकर्षण आहे .श्रीलंकेत आज देखील रामायणातील अनेक ऐतिहासिक स्थळे असल्याचे संशोधनातून समोर येत असते . त्या बदल माहिती घेण्यासाठी लोक त्या स्थळांना भेट देत असतात . अशाच राम आणि रावणाच्या बदल माहिती सांगणाऱ्या ठिकाणाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत .

श्रीलंकेत अनेक संस्था आहेत ज्या आज देखील ज्याठिकाणी रामायणातील घटना घडल्या आहेत अशा ५० पेक्षा अधिक ठिकाणी संशोधन करत आहेत .त्यातुन अनेक प्रकारची माहिती मिळत आहे असे संशोधनातुन पुढे येत आहे .अशाच एका संशोधनातून दावा केला जात आहे कि रावणाचे प्रेत आज देखील श्रीलंकेमधील एका जंगलातील गुहेत आहे .

कोणालाही रावणाच्या मृत्यु कधी झाला असेल याची पुरेशी माहिती देता येत नाही . पण काही संशोधकांच्या मते १० ते ११ हजार वर्षापूर्वी रावणाचा वध झाला असावा असे संशोधनातून समोर येते आहे . अशाच वेळी संशोधक त्याच्या प्रेताबदल दावा करत आहेत .

रैगला या घनदाट जंगलातील ९ हजार फुट उंच डोंगरावर ही गुहा आहे असे संशोधकांचे म्हणने आहे . रावणाचे प्रेत ममी करुन एका ताबुतात बंद करून ठेवले आहे . विशिष्ट प्रकारचा लेप त्या ताबुतला सुरक्षित राहावे यासाठी लावण्यात आला आहे .

इंटरनेशनल रामायण रिसर्च सेंटरच्या संशोधकांच्या मते ताबुत १८ फुट लांब व ६ फुट रुंद आहे व या ताबुतच्या खाली रावणाची सर्व संपती आहे असा दावा संशोधक करत आहेत . त्या संपतीचे रक्षण नाग करतो असा दावा होत आहे .

रावणाचे प्रेत ज्यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचा भाऊ भिभिषण यास देण्यात आले त्यावेळी राजसतेच्या नादात त्याने त्याकडे लक्ष दिले नाही त्यावेळी नागवंशी लोकांनी ते प्रेत स्वताच्या सोबत घेऊन गेले .त्यांना खात्री होती रावण जीवंत होईल त्यासाठी त्यांनी त्याचे प्रेत लेप लावुन ताबुत मध्ये सुरक्षित ठेवले .

संशोधनात रामायणातील पुष्पक विमान ,सीतामाई ज्या ठिकाणी राहीली होती त्या अशोक वाटिका व हनुमानाच्या पाउलांचा देखील माहिती समोर येत आहे . परंतु या सर्व गोष्टींबदल अजुन खूप खातर जमा करणे बाकी आहे . अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे PAGE ला LIKE करा .