देवघरात फक्त या ४ वस्तू ठेवल्यामुळे होईल माता लक्ष्मीची कृपा!

देवघरात फक्त या ४ वस्तू ठेवल्यामुळे होईल माता लक्ष्मीची कृपा!

आपल्या घरात सुख,शांती आणि समृद्धी नांदावी असे वाटत असेल तर परमेश्वराची कृपा असणे खूप आवश्यक असते.खूप पूर्वीपासून घरामध्ये देवाची पूजा अर्चा केली तर घराला भाग्य लाभते असे म्हटले जाते. या साठी घरामध्ये देवघर असावे असे सांगतात. केवळ देवघराची स्थापना करणे हेच पुरेसे नसते तर यासाठी देवघराशी निगडित काही नियमांचे पालन सुद्धा करावे असे सांगितले जाते . असे म्हटले जाते की देवघरामध्ये काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते .

काही विशिष्ट वस्तू देवघरामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते व ती आपल्याला धनलाभ सुद्धा करून देते. या वस्तू देवघरामध्ये ठेवल्यामुळे  सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते .लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन आपल्या घराकडे संपत्ती आकर्षित होते.तर मग आज आपण जाणून घेऊया कोणत्या विशिष्ट वस्तू आपल्या. देवघरात ठेवल्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल

गंगाजल-गंगाजल हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते.यामुळे हिंदू धर्मात प्रत्येक धार्मिक कार्य व पूजेमध्ये गंगाजल न चुकता वापरले जाते. गंगाजल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते.गंगाजल शिंपडल्याने घरात आलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा नाहिशी होते.गंगाजल हे पावित्र्याचे प्रतीक मानले जाते.म्हणूनच गंगाजलामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.गंगाजल देवघरात ठेवल्यामुळे व दररोज यांचे पूजन केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते व दीर्घ काळ घरात वास करते.

मोरपंख-भगवान श्रीकृष्ण यांचे सर्वाधिक प्रिय असलेले मोरपंख हे खूप शुभ मानले जाते.असे म्हटले जाते की मोरपंख जर देवघरात ठेवले तर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात.पूर्वीच्या काळी तर ऋषी मुनी घराच्या अंगणात मोर पाळत असत.मोरपंखाच्या मदतीने ऋषीमूनी शुभ संदेश लिहीत असत.मोरपंखांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.तसेच लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन घरातील आर्थिक तंगी दूर होते.

शालिग्राम-भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचे प्रतिक मानले जाणारे शालिग्राम देवघरात ठेवणे खूप शुभ असते.शालीग्राम देवघरात ठेवण्यामुळे केवळ लक्ष्मी देवी ची नव्हे तर भगवान विष्णूंचीही कृपा होते.घरातील दारिद्र्य दूर होते.घरामध्ये पैसा येतो व दुःख आणि विवंचना दूर होतात.

शंख-माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांनाही शंख प्रिय आहे.देवघरात शंख ठेवणे शुभ असते.दररोज सकाळी व संध्याकाळी पुजा केल्यानंतर शंख वाजवावा असे सांगितले जाते.शंखाच्या मंगलमय ध्वनीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहिशी होते.शंख पूजनाने  भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची कृपा होते. आपले देवघर कोणत्या दिशेला आहे हेसुद्धा महत्त्वाचे ठरते.आपले देवघर हे ईशान्य कोनात असावे असे म्हटले जाते.

beingmarathi