पहिल्यांदा कॅमेऱ्यात दिसली विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी, फोटो तुफान व्हायरल!

पहिल्यांदा कॅमेऱ्यात दिसली विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी, फोटो तुफान व्हायरल!

भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली हा त्याने  दिलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.विराट कोहली हा नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो मग ते त्याचे व्यावसायिक आयुष्य असो अथवा वैयक्तिक आयुष्य. विराट कोहलीने बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाह केला आहे.

दोघेही पती-पत्नी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. अनुष्का व विराटला गेल्यावर्षी वामिका ही मुलगी झाली. यानंतर अनुष्का विराट प्रमाणेच वामिका ची एक छबी कॅमेरामध्ये मिळावी म्हणून मीडिया नेहमीच प्रयत्नशील असतो. मात्र या दोघांनीही आपल्या मुलीचा चेहरा अद्याप सार्वजनिकरित्या दाखवलेला नाही व प्रसारमाध्यमांमध्ये वामिका चे एकही छायाचित्र अद्याप प्रसिद्ध झालेले नव्हते.

वामिकाचे कोणतेही छायाचित्र प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ नये याची पुरेपूर काळजी अनुष्का आणि विराट यांनी घेतली होती व तशी विनंती सुद्धा प्रसारमाध्यमांना केली होती. चाहत्यांना गेल्या वर्षभरापासून विराट आणि अनुष्का च्या मुलीचा चेहरा पाहण्याची उत्सुकता होती व ही उत्सुकता आता थांबलेली आहे. कारण नुकतेच अनुष्का आणि विराट च्या मुलीचा म्हणजे वामिका चा चेहरा पहिल्यांदा कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

हे छायाचित्र आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.सध्या भारतीय क्रिकेट संघ हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून रविवारी या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्याच्या वेळी वामिका आपली आई अनुष्काच्या कडेवर बसून वडिलांना टाळ्या वाजून चिअर अप करताना दिसत आहे. यावेळी कॅमेऱ्यामध्ये पहिल्यांदाच वामिकाची झलक टिपली गेली व क्षणात हा व्हिडिओ व छायाचित्रे व्हायरल झाली.

चाहत्यांना हे छायाचित्र पाहून खूपच आनंद झाला असून सर्वजण वामिका ची व तिचे क्युटनेस ची तारीफ करत आहेत. नायिका ही दिसायला विराट आणि अनुष्का ची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे.या व्हिडिओमध्ये अनुष्का प्रमाणेच वामिकाही विराटला टाळ्या वाजून अभिवादन करत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे.

वामिका ही नुकतीच एक वर्षाची झाली आहे. या एक वर्षभरात वामिकाला मीडियाच्या नजरेपासून वाचवण्याचे हर एक प्रयत्न अनुष्का आणि विराट ने केले. अशाप्रकारे विनंती करूनही कॅमेरामनने अनुष्का आणि वामिकाला कॅमेऱ्यामध्ये टिपल्यामुळे या कॅमेरामन वर कारवाई करण्याचेही संकेत विराटने दिले आहेत व चाहात्यांनासुद्धा इथून पुढे वामिकाची कोणतीही छायाचित्रे प्रसिद्ध करू नयेत अशी विनंती केली आहे.

beingmarathi