पालथे झोपल्यामुळे शरीरावर होतात ‘हे’ ५ दुष्परिणाम

पुरेशी झोप घेणे हे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते. झोपण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणी कोणी सरळ झोपते तर कुणी पालथे झोपते. झोपण्याची पद्धत ही प्रत्येकाच्या सोयीनुसार ठरलेली असते .मात्र पोटावर पालथे झोपणा-या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने काही तोटे नक्कीच होऊ शकतात. आज आपण पोटावर पालथे झोपल्यामुळे शरीरात नक्की काय बदल होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
1) कधीही एका कुशीवर झोपणे हे चांगले असते असे तज्ञांचे म्हणणे आहे. जर पोटावर किंवा पालथे झोपत असाल तर झोपेमध्ये छातीवर आणि मणक्यावर अतिरिक्त ताण येतो व यामुळे मणक्याचे आजार बळावतात तसेच छातीचे दुखणे सुद्धा मागे लागू शकते.
2) पोटावर झोपल्यामुळे झोपण्या अगोदर आपण जेवण केलेले असते व त्यामुळे पचनक्रियेवरही ताण येतो .पचनाच्या समस्या, पोटदुखीच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
3) जेव्हा रात्रभर आपण पालथे किंवा पोटावर झोपतो त्यावेळी निश्चितच मान ही सरळ ठेवली जात नाही.तर मान ही तिरकी करूनच झोपावे लागते अशावेळी मानेचे दुखणे ही बळावते.
4) पालथे झोपल्यामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. मणक्याला मज्जातंतू जोडलेले असल्यामुळे शरीरातील अन्य भागांमध्ये सुद्धा वेदना निर्माण होतात व कधीतरी मुंग्या निर्माण होण्याची समस्याही उद्भवते.
5) विशेषतः गर्भवती महिलांनी पोटावर झोपू नये असे सांगितले जाते कारण यामुळे पोटावर ताण येतो व गर्भाच्या हालचालीमध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात.
पोटावर झोपण्याची सवय मोडण्यासाठी हळूहळू एका कुशीवर झोपण्याची सवय करावी. डाव्या कुशीवर झोपणे हे सर्वांसाठी फायद्याचे असते.