मासिक पाळीच्या काळात संभोग करणे कितपत योग्य, केला असता गर्भधारणा होऊ शकते का?

मासिक पाळीच्या काळात संभोग करणे कितपत योग्य, केला असता गर्भधारणा होऊ शकते का?

गर्भवती होणे ही स्त्रीला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.गर्भवती होणे  याची भावना ही खूप अमूल्य असते. नऊ महिने गर्भवती महिला आपल्या गर्भात एका छोट्याशा जीवाचा सांभाळ करत असते.आई  बनणे हे तेव्हा सुखद वाटते जेव्हा गर्भवती होणे हे पूर्वीपासून नियोजित असते. मात्र जेव्हा अचानक कोणतेही नियोजन न करता स्त्री गर्भवती होते तेव्हा संबंधित आई आणि वडील या दोघांसाठीही तो एक प्रकारचा धक्का असतो.

स्त्रीने गर्भवती होणे हे तेव्हा खूप मोठ्या प्रकारचा धक्का असतो जेव्हा संबंधित स्त्री पुरुष हे नात्याने पती-पत्नी नसतात.सध्याच्या काळात विवाह बाह्य संबंध किंवा विवाहपूर्व संबंध अगदी सहजपणे चालतात. कोणत्याही प्रकारच्या खबरदारी न घेता संभोग केला असता गर्भवती होण्याची शक्यता खूप जास्त असते. मात्र यासाठीही अनेक जण आपल्या अक्कलहुशारी चा वापर करून काही पर्याय शोधून काढतात.

त्यापैकी एक पर्याय म्हणजे जेव्हा स्त्रीची मासिक पाळी चालू असते तेव्हा संभोग केला असता संबंधित स्त्री गर्भवती होऊ शकत नाही असे मानले जाते. मात्र हे अगदी ठामपणे ठरवले जाऊ शकत नाही. हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की स्त्रीचे मासिक पाळी दरम्यान संभोग केला असता तरी गर्भधारणा होऊ शकते का.अनेकदा जोडप्यांना निरोधचा वापर करायचा नसतो अशावेळी सुरक्षित पर्याय म्हणून मासिक पाळीच्या दिवसांमध्ये संभोग केला जातो.

मात्र आज आपण हे जाणून घेणार आहोत की पाळीच्या दिवसांमध्ये संभोग केला असता गर्भधारणा होऊ शकते का. स्त्रियांमध्ये साधारण 28 ते 35 दिवसांची मासिक पाळीची सायकल असते व या दिवसांमध्ये काही दिवस हे गर्भाशयातील अंडबीज यांच्या ओव्हुलेशन चे असतात. ओव्हुलेशन च्या काळामध्ये जर संभोग केला तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूप जास्त असते. बर्‍याचदा ओव्हुलेशनच्या वेळी काही स्त्रियांना रक्तस्त्राव होतो व याला मासिक पाळीचे रक्त स्त्राव समजून शारीरिक संबंध ठेवले जातात.

रक्तस्त्राव ओव्हूलेशनच्या काळात केला असता गर्भधारणा होऊ शकते. ओव्हुलेशनच्या अगदी शेवटच्या दिवशी जरी शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तर त्यामुळे ही गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे पाळीच्या काळामध्ये संभोग केला असता गर्भधारणा होऊ शकत नाही असे अगदी ठामपणे म्हटले जाऊ शकत नाही व म्हणून खबरदारीचे उपाय घेणे खूप आवश्‍यक ठरते.कोणतीही खबरदारी न बाळगता संभोग केला असता काही संसर्ग होण्याची सुद्धा शक्यता असते. याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असे म्हणतात. यामध्ये एडससारख्या रोगाने मधल्या काळात खूपच थैमान घातले होते.

beingmarathi