रात्री झोपताना उशीखाली एक लसणाची पाकळी ठेवा आणि फरक पहा

रात्री झोपताना उशीखाली एक लसणाची पाकळी ठेवा आणि फरक पहा

धावपळीच्या जीवनामध्ये जेवणा खाण्याच्या अनियमित वेळा, धावपळ, झोपण्याच्या अनियमित वेळा, जागरणे ,इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा मोठ्या प्रमाणातील वापर या सर्व घटकांमुळे झोपेच्या विकारांना जणूकाही आमंत्रण दिले जात आहे. कधीकधी व्यक्तीला प्रचंड थकवा जाणवत असतो अशावेळी नितांत झोपेची आवश्यकता असते मात्र शांत झोप लागणे अगदी दुरापास्त होऊन जाते. अनेकांना वर्षानुवर्षे निद्रानाशाची समस्या जाणवत असते. झोपेचा प्रत्यक्ष संबंध हा शरीरातील सर्व अवयवांच्या प्रभावी कार्यासोबतच मेंदूच्या कार्यांशी सुद्धा जोडलेला आहे.

मात्र शांत व पुरेशी झोप मिळत नसेल तर काही काळानंतर या सर्वच अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम घडून येतो. शांत झोप लागावी यासाठी अनेक जण डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे सुद्धा घेत असतात मात्र या औषधांचे साईड इफेक्ट सुद्धा सहन करावे लागतात. अँलोपँथिक औषधां प्रमाणे वर्षानुवर्षे आयुर्वेद आणि घरगुती उपायांचाही वापर शांत झोप लागण्यासाठी आणि झोपेशी निगडीत समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो.

लसूणचे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक फायदा हा निद्रानाशा सारख्या आजारावर प्रभावी उपाय करण्यासाठी केला जातो. आपल्या वाडवडिलांनी लसणाची एक कळी झोपण्यापूर्वी आपल्या उशीच्या खाली ठेवून झोपले असता खूप पटकन आणि शांत झोप लागते असे सांगितलेले आहे. या उपायांमध्ये निश्चितच तथ्य आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की लसूणची  एक पाकळी झोपेच्या आधी आपल्या उशीखाली ठेवल्याचे नक्की आपल्या शरीराला व झोपेसाठी काय फायदे होतात.

1) लसूणमध्ये पोषक घटकांचा व औषधी गुणधर्मांचा मुबलक साठा असतो.त्यामुळे अनेक आजारांवर आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. दिवसभर कष्ट करून आपले शरीर थकून जाते व या अतिरिक्त श्रमांमुळे कधीकधी शरीराला आवश्यकता असूनही पुरेशी झोप मिळत नाही.याला कारण म्हणजे आपल्या शरीरातील झिंक या घटकाची कमतरता होय. लसुन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात  मँग्नेशिअम  असते ज्यामुळे आपल्या शरीराला तणाव हलका झाल्याची भावना निर्माण होऊन सुरक्षित अशी झोप लागते.

2) लसुन च्या तीव्र आणि  उग्र वासामुळे घाणेंइंद्रियांचे कार्य प्रभावी होते आणि श्वासोच्छवासही योग्य पद्धतीने घेता येतो. जेव्हा सर्दी मुळे आपले नाक चोंदलेले असते तेव्हा झोपण्यास किती त्रास होतो हे आपण अनुभवलेले असते. सर्दीच्या काळामध्ये लसुन आपण उशीखाली ठेवला असता आपल्याला श्‍वासोच्छ्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो.

3) लसूणमध्ये योग्य प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही शांत झोपेसाठी खूपच उपयुक्त ठरतात. पोटॅशियम हे शांत गाढ झोपेसाठी आणि तणाव हलका करण्यासाठी आवश्यक असलेल्या गाबा न्युरोट्रानँसस्मिटर निर्मितीसाठी उपयुक्त ठरते .गाबा न्युरोत्ट्रान्सस्मिटर मुळे आपल्या मेंदूवरील अतिरिक्त ताण हलका होतो.

यामुळे कोणत्याही नवीन ठिकाणी सुद्धा अतिशय शांतपणे व सहजपणे झोप लागण्यास मदत मिळते.पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक आपल्या रोजच्या आहारात योग्य त्या प्रमाणात घेणे फार आवश्यक असते. मात्र तरीसुद्धा आपल्या शरीराला योग्य ती झोप मिळत नसेल तर लसूण पाकळी उशीखाली ठेवण्याचा उपाय नक्कीच करून पहा.

4) रात्रीच्या वेळी झोपेत अडथळा आणणारा अजून एक घटक म्हणजे डास होय. उशीखाली लसणाची पाकळी ठेवली असता त्याच्या उग्र वासामुळे डासांच्या शिरकावास आळा बसतो.
5) लसूणमध्ये असलेल्या एलिसियन घटकामुळे शरीरामधील तनाव हलका होतो व पटकन झोप लागण्यासाठी साहाय्य मिळते.
6) लसुन मध्ये असलेल्या एलिसिनिन या घटकामुळे कोणत्याही बॅक्टेरिया च्या संसर्गापासून बचाव होतो.

7) लसूणमध्ये असलेल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालते.
8) लसूणमध्ये असलेल्या गंधक आणि उष्ण गुणधर्मामुळे आपल्या मेंदूला शांत व आनंदी वाटते व आपोआपच झोप लागते.

9) पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की लसुनचा तीव्र आणि उग्र वास हा कोणत्याही वाईट दृष्टी किंवा आत्म्यापासून आपले संरक्षण करतो व रात्रीच्या वेळी वाईट स्वप्ने पडण्यापासून बचाव करतो म्हणून झोपते वेळी उशीच्या खाली लसणाची पाकळी ठेवावी.

beingmarathi