स्त्रियांना आक्रुष्ट करतात ‘या’ प्रकारचे पुरुष

स्त्रियांना आक्रुष्ट करतात ‘या’ प्रकारचे पुरुष

ज्याप्रमाणे प्रत्येक पुरुषाच्या आपल्या भावी पत्नी किंवा प्रेयसी कडून काही अपेक्षा असतात व त्याविषयीची मनामध्ये एक प्रतिमा असते त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीच्या सुद्धा आपल्या पती किंवा प्रियकराकडून काही अपेक्षा असतात. बऱ्याचदा समाजामध्ये अशी मानसिकता दिसून येते की स्त्री ही भौतिक गोष्टींकडे जास्त आकर्षित होते किंवा पुरुषांच्या दिसण्यावर भाळते मात्र यामध्ये संपूर्ण पणे तथ्य नाही म्हणूनच आज आपण अशा काही गुणांना जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे स्त्रिया आकृष्ट होतात.

1) उत्कृष्ट विनोदबुद्धीः उत्कृष्ट विनोदबुद्धी ही जणू काही दैवी देणगी असते. उत्कृष्ट विनोद बुद्धी सर्वांना लाभत नाही. स्त्रीला तिला वेळोवेळी हसवणारा व कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्या कठीण परिस्थितीमध्ये विनोद सांगून सकारात्मक पद्धतीने पुढे जाण्यास प्रोत्साहित करणारा जोडीदार निश्चितच आवडतो. अगदी कठीण परिस्थितीमध्ये वातावरणाला सकारात्मक करण्याची ताकद विनोदबुद्धी मध्ये असते त्यामुळे उत्कृष्ट विनोदबुद्धी असलेल्या व सकारात्मक पद्धत पद्धतीने सर्वांशी वागणार्‍या पुरुषाकडे स्त्रिया अगदी सहजपणे आकृष्ट होतात.

2) प्रभावी रहाणीमानः केवळ आकर्षक व्यक्तिमत्व असणारे नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वाला साजेल असे राहणीमान व कपडे परिधान करणाऱ्या पुरूषांकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात. प्रेझेंटेबल व नीटनेटके पुरुष सर्व स्त्रियांना आवडतात यासाठी महागडे कपडे घालण्याची आवश्यकता नाही तर आपला रंग, उंची यानुसार योग्य त्या रंगसंगतीचे कपडे घालावे. 

3) बर्‍याचदा असा समज असतो की जे पुरुष व र्च स्व गाजवणारे ,आपले बोल खरे करणारे व काय झालं काय झालं वेळप्रसंगी हाणामारी करणारे पु रु ष स्त्रियांना खूप आवडतात .अशा प्रकारचे पुरुषांचे चित्र भारतीय चित्रपटांमध्ये केले जाते मात्र प्रत्यक्षात स्त्रियांना शांत,समंजस असे व समजदार स्वभावाचे पुरूष आवडतात. आजकाल मुलींना योग्य वेळी आपले मत मांडणारे पुरुष आवडतात. मतप्रदर्शन न करता शांतपणे समोरच्याचे बोलणे ऐकून घेणे व परिस्थितीचा आढावा घेणा-या अशा मुलांकडे स्त्रिया जास्त प्रमाणात आकर्षित होतात.

4) प्रत्येक वेळी शारीरिक सौंदर्य कडे स्त्रिया आकर्षित होत नाही मात्र सर्वसाधारणपणे स्त्रियांचे आपल्या जोडीदाराविषयी अपेक्षा म्हणजे आपला जोडीदार आपल्यापेक्षा उंच असावा असे स्त्रियांना वाटते.सर्वच स्त्रिया जोडीदाराच्या उंचीला महत्व देत नाहीत मात्र जर एखाद्या स्त्रीला आकृष्ट करून घ्यायचे असेल तर आपल्या देहबोली वर विशेष मेहनत घ्यावी. आपले खांदे नेहमी  सरळ ठेवून  आत्मविश्वासपूर्वक ठेवून ताठ उभे राहिले असता आपली उंची व्यवस्थितपणे उठून दिसते.

5) स्त्रियांना अभ्यासू, सहज पणे व मोकळेपणाने संभाषण करणारे पुरुष जास्त आकर्षक वाटतात.त्यामुळे शक्यतो समूहा मध्ये संभाषण करण्यास उत्सुक असणारे किंवा बोलण्यामध्ये पुढाकार घेण्यास हजर असणारे पुरुष त्यांना आवडतात. स्त्रियांना संभाषण करताना सुद्धा आपल्या नात्याबद्दल किंवा आयुष्यातील घटना गंभीरपणे विचार करून बोलणारे पुरुष आवडतात त्यामुळे एखाद्या स्त्री बद्दल पुरुषांना खूप गंभीर भावना व्यक्त करताना त्या व्यक्तीसोबत मोकळे पणाने मांडाव्यात.

6) खूप वर्ष एका नात्यामध्ये बांधले गेलेल्या प्रियकर-प्रेयसी मधून काही काळानंतर तोचतोचपणा निर्माण होतो यासाठी स्त्रियांना नवीन गोष्टी व आव्हाने स्वीकारणारे पुरुष आकर्षित करतात पाहते खेळ खेळणारे प्रवास करणारे स्त्रियांना खूपच भावतात स्त्रियांनी सर्वानाच पुरुषांपेक्षा जास्त संमेलन व्हिडिओ आलेल्या स्वभावाच्या असतात असे मानले जाते त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या भावाने का गरजेला योग्य प्रतिसाद देणारे पुरुष आकर्षित करतात त्याचप्रमाणे स्त्रियांना त्यांचे पुरुषांसोबत असणे कसे विशेष आहे हे पुरुषांकडून जास्त केले जावे अशी अपेक्षा सुद्धा असतो

7) स्त्रियांना इतरांना आधार देणारे पुरुष खूप आवडतात .इतरांच्या भावनांचे मूल्य जाणाऱ्या पुरुष कोणत्याही स्त्रीला आकर्षित  करण्यास यशस्वी ठरतो. प्रत्येक स्त्रीला आपला जोडीदार हा आपल्याला आदर देणारा व आपल्या कुटुंबातील सदस्यांना ही आदर देणारा असावा असे नेहमीच वाटते.
8) प्रत्येक स्त्रीला आपल्या जोडीदाराने आपल्या सोबत एकनिष्ठ असावे अशी अपेक्षा असते व आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठपणे राहणारे पुरुष हे सर्व स्त्रियांना आदर्श वाटतात.

9) स्त्रियांना भावनिक दृष्ट्या खंबीर व आपली मते स्पष्टपणे मांडणारे पुरुष आवडतात. आयुष्याच्या प्रति गंभीरपणे विचार करणारे पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात .बालिशपणा दाखवणारे पुरुष त्यांना आवडत नाही.
10) केवळ आपल्याच बोलणे समोरच्याला ऐकवणाऱ्या पुरुषांपेक्षा समोरच्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे आणि संयमी पणे ऐकणारे पुरुष स्त्रियांना जास्त आकृष्ट करतात.

beingmarathi