हिमेश रेशमियाने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट!

हिमेश रेशमियाने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक ,गीतकार व संगीतकार हिमेश रेशमिया यांचा जन्म गुजरात येथे झाला.हिमेश रेशमिया बॉलीवूड मध्ये त्याच्या रॉकिंग गाण्यांमुळे ओळखला जातो. हिमेश रेशमियाने आतापर्यंत तेरा सुरूर ,झलक दिखला जा यांसारखे गाणे गायली आहे . गाण्यांमुळे त्याचे अनेक चाहते आहेत.

हिमेशने 2006 साली एकट्याने तेरा सुरूर या अल्बमचे गाणी गायली होती. या अल्बमने कमाईचे रेकॉर्ड मोडले होते आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात ही गाणी  ऐकली जातात. हिमेशने आपल्या वीस वर्ष जुन्या वैवाहिक जीवना पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला व आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. हिमेश ला पहिल्या पत्नीपासून एख मुलगा सुद्धा आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर हिमेशने त्याची प्रेयसी सोनिया सोबत विवाह केला. हा विवाह चांगलाच गाजला होता .सोनिया आणि हिमेश घ्या लग्नाचे फोटो सुद्धा खूप व्हायरल झाले होते.

हिमेश आणि सोनिया ने आपल्या काही मोजक्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लोखंडवाला अपार्टमेंट येथील घरामध्येच विवाह केला होता.या दोघांचा विवाह गुजराती रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नाअगोदर दहा वर्षे सोनिया आणि हिमेश हे रिलेशनशिपमध्ये होते. सोनियाने टेलिव्हिजनवरील काही मालिकांमध्ये काम केले आहे.काही  सिरीयल मध्ये सोनिया दिसली होती .

हिमेशच्या पहिल्या पत्नीचे नाव कोमल होते व कोमल सोबत घटस्पोटा बद्दल हिमेशने असे सांगितले की या दोघांमध्ये काही मतभेद होते त्यामुळे ते एकत्र राहू शकत नव्हते. मात्र या दोघांना एकमेकांबद्दल खूप आदर आहे. हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांमुळे बॉलीवूड मध्ये एक वेगळी ओळख मिळवून आहे. सलमान खानच्या काही चित्रपटांना हिमेश रेशमिया ने संगीत सांगितले आहे.काही दिवसांपूर्वी हॅपी हर्डी अंड हीर या चित्रपटाद्वारे हिमेशने कमबॅक केले होते.

beingmarathi

Related articles