जमिनीवर बसून जेवत नसाल तर आज पासून सुरू करा! अनेक आरोग्यदायी फायदे मिळण्यासाठी आहे उपयुक्त

जमिनीवर बसून जेवत नसाल तर आज पासून सुरू करा! अनेक आरोग्यदायी फायदे मिळण्यासाठी आहे उपयुक्त

पाश्चिमात्य संस्कृतीने भारतीय संस्कृतीवर हल्ला केल्याचे अनेकदा बोलले जाते. आपल्या जेवणाच्या सवयी पासून आपण कोणत्या अन्नपदार्थ करतोय इथपर्यंत आपली संस्कृती आपल्याला दिसत असते. आज-काल पाश्चिमात्यांच्या ओढा या पिढीमध्ये दिसतो त्यामुळे आपल्या अनेक सवयी देखील त्यांच्या प्रमाणे बदलत आहेत.

जेवणासाठी भारतीय पद्धत म्हणजे मांडी घालून बसणे. मात्र, डायनिंग टेबल घरात आल्यापासून हे जमिनीवर मांडी घालून जेवणे कालबाह्य होत चालले आहे.

मांडी घालून जेवल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात, हे आपण आज जाणून घेणार आहोत!

मांडी घातल्याने आपले शरीर नैसर्गिक अवस्थेत सुखासनात विराजमान होते. जमिनीशी आपल्या शरीराचा संबंध येतो आणि त्यामुळे आपण आपल्या आरामदायी स्थितीत जेवण करू शकतो.

असे केल्याने, आपल्या पाठीचा मणका ताणल्या जातो, आणि मणक्याचे कोणते विकार भविष्यात उद्भवणार असतील ते आपल्या जवळपासही भटकत नाहीत.

आपण आपल्या नैसर्गिक स्थितीत असल्याने जेवण व्यवस्थित जाते, आणि ते पचन होणे देखील सोपे होते. रक्ताभिसरण क्रियेमध्ये देखील मदत यातून मिळते आणि त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य व्यवस्थित राहते.

शरीराच्या खालच्या भागाच्या मांस पेशी या नैसर्गिकरित्या ताणल्या जातात आणि त्यामुळे हळूहळू मजबूत व्हायला लागतात. पाठीचा मणका ताणला जातो, त्यामुळे हाड मजबूत होते आणि शरीराचे संतुलन बिघडत नाही.

Being Marathi