Articles Featured Food & Drink

दहयासोबत खा हे पदार्थ आणि मिळवा दुप्पट फायदे ..

Sharing is caring!

दही हे कैल्शियमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. दहयामध्ये अनेक  विटामीन ,कैल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. प्रत्येक माणसाने किमान एक वाटी दही खायला हवे . दही शक्यतो दुपारी खावे कारण रात्री दही खाऊ नये. दहया सोबत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळवेत हे देखील तितकेच महत्वपूर्ण आहे. असे काही पदार्थ आहेत , जे आपण दहयासोबत खायलाच हवेत कारण त्यांचे अनेक फायदे आहेत. आज आपण असे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत जे दहयासोबत खाल्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊ या दही आणि कोणते पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

काळे मीठ आणि जिरे –  एक वाटी  दह्यामध्ये तुम्ही जर चिमूटभर मीठ आणि जिरे जर टाकले तर दहयाची चव तर वाढतेच पण या बरोबर काळ मीठ आणि जिर यामुळे तुमची भूक देखील वाढते. काळे मीठ आणि जिरे पचनासाठी देखील खूप उपयुक्त असते. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही काळे मीठ आणि जिरे टाकून दही  खावे. या बरोबरच तुमची पचन संस्था देखील चांगली राहते.
,मध – मध आणि दही एकत्र करून खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत , जसे की तुम्हाला जर सतत तोंड येत असेल तर तुम्ही दही आणि मध खावे यामुळे तोंडात जखम होत नाहीत. आणि तोंडात जरी जखमा झाल्या असतील तर त्या देखील भरून येतात. जर तुमच्या शरीरातील उष्णता वाढली असेल तर तुमचे तोंड येते आणि ते कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे दही आणि मध यामुळे तोंडातील जखमा भरून येतात.
काळी मिरी – ज्याचे वजन खूप जास्त आहे , अशा लोकांनी काळे मीठ , काळी मिरी  हे दह्यासोबत एकत्र करून खावेत. कारण यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. या बरोबरच वाढलेले वजन देखील कमी होण्यास खूप मदत होते. जर तुम्हाला तुमच्या शरीरावरील अतिरिक्त  चरबी कमी करायची असेल तर दही आणि काळी मिरी एकत्र करून खा. नक्की तुम्हाला फरक जाणवेल.
साखर आणि ड्रायफ्रूटस – जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही दही आणि साखर, सुकेमेवे एकत्र करून खावेत यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते.

ओवा , अजवान – दही आणि ओवा  जर दहयासोबत खाल्ले तर त्याचे देखील अनेक फायदे होतात. पचनासाठी दही आणि ओवा खूप उपयुक्त आहे.
तांदूळ – तांदूळ आणि दही म्हणजेच दही भात आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर तुम्ही तांदूळ दही एकत्र शिजवून खाल्ले तर त्याचे बरेच फायदे तुम्हाला अनूभवता येतील. दही भात एकत्र खालल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता  कमी होते. उष्णता कमी करण्यासाठी तांदूळ अतिशय उपयुक्त आहे.बडीशेप आणि दही – अनेक लोकांना निद्रानाश होतो म्हणजेच त्यांना झोप येत नाही. अशासाठी एक वाटी दही घेऊन त्यामध्ये जर बडीशेपचे काही दाणे जर टाकले तर चांगली झोप येते. झोपेची समस्या दूर होण्यासाठी दही आणि बडीशेप एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. अनेकांना पोटात गॅस देखील पकडला जातो ती समस्या देखील दही आणि बडीशेप खाल्यामूळे दूर होते.
ओट्स – ओट्स आणि दही एकत्र खाल्यामुळे तुमच्या शरीरासाठी  आवश्यक असलेले जसे की कैल्शियम, पोटेशियम  आणि  प्रोटीन  मिळतात. ज्यामुळे तुमचे हाडे मजबूत होतात.केळी – केळी  खाल्यामुळे पोट साफ होते. दही आणि एकत्र खाल्ले तर पचनासाठी बरे पडते. पचन व्यवस्थित होते. दही आणि केळी हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. केळी आरोग्यासाठी खूप चांगली आहे.वरील सर्व पदार्थासोबत दही खावे आरोग्यासाठी चांगले असते.