Articles Food & Drink health

जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्य देखील मजबूत करतात शेंगादाणे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

Sharing is caring!

जेवणात, नाश्त्यात प्रत्येक ठिकाणी आढळणारे गोष्ट म्हणजे शेंगदाणे खाणे! आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत गरजेचे असते आणि आरोग्याच्या अनेक समस्यांवर हा उपाय देखील असतो, हे अनेक जणांना माहित नसेल. आज आपण जाणून घेऊया शेंगदाणे खाल्ल्याने होणारे फायदे!

शेंगदाणे हे गरिबांचे बदाम म्हणून ओळखले जातात. म्हणजे ज्यांना बदाम खाणे किंवा त्यावर पैसे खर्च करणे शक्य नाही ते लोक पर्याय म्हणून शेंगदाणे खाऊ शकतात. शेंगदाण्या मुळे मेंदूला ताकद मिळते आणि आपली स्मरणशक्ती वाढते.

यामध्ये पोटॅशियम, मँगॅनीज, तांबे, आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. त्याबरोबर लोह आणि सेलेनियम मुळे पौष्टिक घटक देखील आढळतात. हिवाळ्या मध्ये शेंगदाण्यासोबत गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तर यामुळे कंबर आणि सांधेदुखी मध्ये देखील आराम मिळतो.

शेंगदाण्यात अँटिऑक्सिडंट, लोह, फोलेट याचबरोबर कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते. कर्करोगाचा धोका देखील कमी होतो, आणि मूळ म्हणजे मधुमेहापासून आपले संरक्षण होते. कारण, शेंगादाणे रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करतात.