मास्क बदलण्याची ही आहे योग्य वेळ!

मास्क बदलण्याची ही आहे योग्य वेळ!

सर्दी, खोकला किंवा इतर आजारांप्रमाणे आता कोरोना हा आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. या काळामध्ये मास्क वापरणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे मास्क बदलायचा कधी हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो.

मुळात कोणता मास्क वापरणे आपल्यासाठी योग्य आहे, हे देखील जाणणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कापडी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे असते.

कारण, त्यांना धुऊन ठेवणे हे सोपेही जाते आणि निसर्गाच्या दृष्टीने रिसायकलिंग साठी देखील या गोष्टी उपयुक्त असतात. त्यामुळे कापडी मास्क वापरत असाल तर तो धुताना नेहमी वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाच्या पाण्याखाली धुवावा.

यामुळे, त्यावर बसलेले धूलिकण किंवा किटाणू, विषाणू वाहत्या पाण्यासोबत निघून जातात आणि तो मास्क खरोखर स्वच्छ होतो.

तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असाल तर N95 , N99 हे मास्क तुम्ही पाच दिवस वापरू शकता. पाच दिवस वापरल्यानंतर मात्र, पुन्हा हे मास्क वापरणे योग्य नाही. तुम्ही इतर क्षेत्रात असाल तर तुम्ही हा मास्क धुऊन वापरू शकता.

कापडी मास्क धुतल्यानंतर सूर्यप्रकाशात धरून एकदा बघावा. त्यातून आरपार छिद्रातून दिसायला लागले तर, तो मास्क आता पुन्हा वापरू नका हा संदेश आपल्याला देत असतो. त्यामुळे मास्क कडे लक्ष देणे देखील तेवढेच गरजेचे असते

Being Marathi