लग्नानंतरच्या पहिल्या रात्री पतीला बदामाचे दूध का दिल्या जाते? जाणून घ्या या मागचे कारण..!

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री पतीला बदामाचे दूध का दिल्या जाते? जाणून घ्या या मागचे कारण..!

दहीकोणत्याही बॉलीवूड किंवा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीचा एक प्रसंग हमखास ठरलेला असतो ज्यामध्ये नववधूला आपल्या सजवलेल्या पलंगावर बसवलेले असते व तीचा पती खोलीमध्ये येतो त्यावेळी त्याला बदामाच्या दुधाने भरलेला ग्लास हातामध्ये घेऊन ते  दूध ती प्यायला सांगते. हा प्रसंग नायक आणि नायिकेच्या मिलनाचे प्रतिक म्हणून दाखवला जातो.

अगदी फार पूर्वीपासून चित्रपटांमध्ये हा प्रसंग चित्रित केला जातो आणि तो प्रेक्षकांना बऱ्याचदा हास्यास्पद सुद्धा वाटतो यावरून चेष्टा-मस्करी सुद्धा केली जाते. मात्र प्रत्यक्षात सुद्धा ही प्रथा अनेक भागांमध्ये पाळली जाते. लग्न झाल्यानंतर पती-पत्नीच्या पहिल्या मिलनाच्या रात्री पत्नी पतीला दुधाने भरलेला ग्लास पिण्यासाठी देते यामागे नक्की काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वीच्या काळी वर आणि वधू एकमेकांना लग्ना अगोदर भेटत नसत किंवा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद होत नसे अशा वेळी मिलनाच्या रात्री या दोघांना संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून हा दुधाचा ग्लास वधूच्या हाती दिला जात असे व दुधाचा ग्लास देण्याच्या निमित्ताने या दोघांमध्ये सहजपणे संवाद घडू शकतो अशी अटकळ त्यामागे बांधली जात असे.

लग्नाच्या निरनिराळ्या समारंभांमध्ये वर आणि वधू दोघांनाही जागरण आणि धावपळ झालेले असते अशा वेळी लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा हे दोघे जण एकमेकांना प्रथमच एकांतात भेटणार असतात तेव्हा हा गरम दुधाचा प्याला काहीशी ऊर्जा निर्माण करू शकतो असा विचार केला जातो.

आपल्या प्राचीन साहित्यामध्ये सुद्धा का म क्री डा किंवा प्रणयाशी संबंधित अनेक प्रकारची वर्णने केलेली आहेत. प्रणय क्रीडा करताना योग्य तो रस  पती आणि पत्नीमध्ये असेल तर त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखद आणि समाधानाचे होते असे मानले जाते वही स्फूर्ती,ऊर्जा निर्माण होण्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा काही घटकांचा उल्लेख केला गेला आहे यापैकी केशर, बदाम ,शिलाजीत ,काळीमिरी, बडीशेप या घटकांमुळे पुरुषांमध्ये काम क्रीडा करण्याची ताकद निर्माण होते व म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री जे दूध पिण्यासाठी दिले जाते ते या घटकांना दुधामध्ये खूप वेळ उकळून मग तयार केलेले खास दूध असते.

दूध हे अतिशय गुणकारी मानले जाते .दुधामध्ये प्रथिने, कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. प्रथिने आणि कर्बोदकांमधे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण त्याच बरोबर टेस्टेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या संप्रेरकांच्या कार्याला गती मिळते .दुधाच्या नियमित सेवनामुळे शु क्रा णूंची संख्या वाढते तसेच  का मे च्छे मध्ये सुद्धा वाढ होते असे आढळून आले आहे.

beingmarathi