जाणुन घ्या सर्वात खतरनाक ब्लॅक कॅट कमांडोचा महिन्याचा पगार व त्याच्या रँकिंग विषयी माहित नसलेल्या गोष्टी

जाणुन घ्या सर्वात खतरनाक ब्लॅक कॅट कमांडोचा महिन्याचा पगार व त्याच्या रँकिंग विषयी माहित नसलेल्या गोष्टी

देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे संरक्षण व्यवस्था ही तितकेच महत्त्वपूर्ण असते. देशाच्या संरक्षणासाठी देशाचीसंरक्षण व्यवस्था व सैन्य रात्रंदिवस झटत असते.देशाच्या संरक्षण व्यवस्थेत नौदल, लष्कर, वायुसेना हे प्रमुख स्तंभ देशाच्या संरक्षणासाठी असतात. देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये देशाच्या लष्करातील जवान ,अधिकारी व कमांडो आपल्या प्राणांची बाजी लावत असतात.

देशाच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी आणि देशांतर्गत दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी एनएसजी कमांडो अर्थातच ब्लॅक कँट कमांडो खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आज आपण देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा अविभाज्य आणि मोलाचे अंग असलेल्या एनएसजी कमांडो बद्दल काही तथ्य जाणून घेणार आहोत.

एनएसजी कमांडो अर्थात ब्लॅक कँट कमांडो हे देशाच्या गृह आणि केंद्र खात्याच्या अखत्यारी मध्ये येतात.एनएसजी कमांडो ची स्थापना 1984 साली झाली.ऑपरेशन ब्लू स्टार,ऑपरेशन गोल्डन टेंपल आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी व दहशतवादी कारवायांपासून संरक्षण देण्यासाठी एनएसजी कमांडोची स्थापना करण्यात आली.

एनएसजी कमांडोची भरती हे संरक्षण दलामध्ये आधीपासून कार्यरत असलेले किंवा पँरामिलिटरी फोर्स मध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीं साठीच खुले असते. एनएसजी कमांडो दलामध्ये भरती होण्यासाठी लष्करामध्ये असाधारण कामगिरी करणे खूप आवश्यक असते व अशाच अधिकारी किंवा जवान यांना कमांडो मध्ये संधी दिली जाते.

एनएसजी कमांडो हे प्रामुख्याने दहशतवाद विरोधी प्रतिबंधक कार्य करत असतात. एनएसजी कमांडो हे देशातील राजकारणी वा अन्य क्षेत्रांमध्ये व्हीआयपी व्यक्तींना संरक्षण देण्याचे कार्य प्रामुख्याने करतात.एनएसजी कमांडोची रँक पुढीलप्रमाणे आहे

 • अधिकारी
 • (i) महासंचालक. (लेफ्टनंट जनरल)
 • (ii) अतिरिक्त महासंचालक. (लेफ्टनंट जनरल / मेजर जनरल)
 • (iii) महानिरीक्षक. (मेजर-जनरल)
 • (iv) उप महानिरीक्षक. (ब्रिगेडियर)
 • (v) गट कमांडर. (कर्नल / कमांडंट)
 • (vi) स्क्वॉड्रॉन कमांडर (लेफ्टनंट-कर्नल / 2 आयसी)
 • (vii) टीम कमांडर. (प्रमुख / कॅप्टन / सहाय्यक कमांडंट / उप कमांडंट)
 • सहायक कमांडर ( जेसीओ )
 • (viii) सहाय्यक कमांडर ग्रेड I. (सुभेदार मेजर)
 • (ix) सहाय्यक कमांडर ग्रेड II. (सुभेदार)
 • (x) सहाय्यक कमांडर ग्रेड III. (नायब सुभेदार)
 • अधिकारी व सहाय्यक कमांडर व्यतिरिक्त इतर व्यक्ती-
 • (xi) रेंजर श्रेणी I.
 • (xii) रेंजर श्रेणी II.

ब्लॅक कँट किंवा एनएसजी कमांडो खूप जोखमीचे काम करत असतात व त्यांच्या निवडीसाठी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी व क्षमता असणे गरजेचे असते.अतिशय खडतर अशा परिस्थितीत ही काम करणा-या ब्लॅक कँट कमांडोंचे वेतन हे निश्चित केले जाते. ब्लॅक कँट कमांडोंचे वेतन साधारणपणे दीड लाख ते अडीच लाख रुपये इतके असते व त्यांना निरनिराळे भत्ते आणि अन्य सुविधा सुद्धा पुरवल्या जातात.

साधारणपणे दहा वर्षांच्या कामगिरीनंतर या कमांडोंना वरच्या रँक वर पाठवले जाते.एनएसजी कमांडोंना 2019 सालापासून महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी काढून दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवण्याची जबाबदाऱ्या देण्यात आली आहे.

beingmarathi