ही आहेत आतड्याचा सुजेची लक्षणे आणि उपाय….!

ही आहेत आतड्याचा सुजेची लक्षणे आणि उपाय….!

आतड्यामध्ये सुज येणे हा प्रकार इतका गंभीर नाही जितका आपल्याला वाटतो. मात्र बऱ्याच वेळा ही सूज जास्त काळ राहिली तर आतड्याचा कर्करोग होण्याची समस्या वाढते. काय असतात त्याची लक्षणे आणि काय आहेत उपाय जाणून घेऊया:

पोटात दुखणे, किंवा मुरडा येणे, सतत अतिसाराचा त्रास होणे, गुदद्वारात वेदना किंवा रक्त पडणे, पचनाशी निगडीत त्रास होणे, सतत शौचास जाण्याची इच्छा होणे, याच बरोबर भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, ताप येणे, थकवा जाणवणे, शौचास गेल्यानंतर त्रास होणे, या सगळ्या प्रकारात आतड्याचा कर्करोग घासण्याची समस्या असू शकते!

आतड्याची सूज कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी भरपूर घरगुती उपाय आहेत. त्यापैकी जास्त पाणी पिण्यामुळे शरीरातील अनिष्ट द्रव्य बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे डीहायड्रेशन सुद्धा होत नाही.

आतड्याची सूज कमी करण्यासाठी कोरफड खूप उपयुक्त ठरते. कोरफड जखम भरून काढते वेदनारहित अवयव करते, आणि सूज देखील कमी करते.

भरपूर प्रमाणात जी लोक प्रथिने खातात त्यांना असे त्रास होत नाहीत. मसालेदार आणि चमचमीत खाणाऱ्या लोकांना आतड्यावर सूज येण्याचे प्रकार जास्त होतात.

विटामिन डी घेणारे लोक या समस्येला बळी पडत नाहीत. त्याचबरोबर दूधाचे सेवन करणारे लोकही या समस्येपासून सुरक्षित राहतात.

ग्रीन टी हेदेखील औषधी गुणधर्म घेऊन आलेले एक पेय आहे. वजन कमी करण्यासाठीच नाही तर, आतड्यावरील सूज सुद्धा कमी करण्यासाठी ग्रीन टी चा वापर केला जातो.

Being Marathi