Articles Celebrities Entertainment

आर्ची बॉलीवुडमध्ये देखील चिंगाट .. लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार

Sharing is caring!

ये मराठी सांगितलेलं समजत नाही का ? इंग्लिश मध्ये सांगू का असं म्हणत मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अर्ची आता लवकरच आपल्याला हिंदी चित्रपटात देखील दिसणार आहे. मराठी सिनेमा सैराट , ज्या चित्रपटाने अनेक इतिहास रचले , अनेक विक्रम मोडीत काढले त्या चित्रपटात अर्चना म्हणजेच आरचीची भूमिका रिंकू राजगुरु हिने केली होती. ही भूमिका तूफान गाजली , रिंकू देखील प्रचंड प्रसिद्ध झाली. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या. त्या नंतर तिने दोन मराठी चित्रपट देखील केले. कित्येक जाहिराती देखील केल्या. लॉक डाऊनमध्ये देखील रिंकू हंड्रेड या वेबसिरीजमध्ये झळकली. तिथे देखील तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

रिंकूचा करियरचा ग्राफ वाढत चालला आहे.ती आता काही केल्या मागे वळून पाहणार नाही हे मात्र दिसून येत आहे. लवकर ती अॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज्ड या चित्रपटात देखील दिसणार आहे. ‘अनपॉज्ड’ हा चित्रपट पाच बड्या लोकांनी एकत्र येऊन बनविला आहे यामध्ये राज एंड डीके, निखिल अडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण या बरोबरच नित्या महरातो या पाच मित्रांनी एकत्र येऊन हा चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे.तो प्रयोग असा की पाच लघु चित्रपट एकत्र करून हा सिनेमा बनविला जात आहे.’ग्लिच’, ‘अपार्टमेंट’, ‘रॅट-ए-टॅट’, ‘विषाणू’ आणि ‘चाँद मुबारक’ या पाच चित्रपटांचा बनवून हा एकत्र सिनेमा बनविला आहे.

येत्या 18 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लिलेट दुबेण यांच्या ‘रॅट ए टॅट ह्या चित्रपटात रिंकू राजगुरू पाहायला मिळणार आहे. तिच्या सोबत तनिष्का चटर्जी देखील झळकणार आहे. रिंकू राजगुरू सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टिव असते. तिचे अनेक फोलोवर्स देखील आहेत. नुकतीच रिंकू राजगुरू एका चित्रपटांच्या शूटिंगसाठी लंडनला देखील गेली होती. हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरू हिला मिळत असलेले यश हे नक्कीच अभिमानास्पद आहे. नागराज मंजुळे यांनी रिंकू राजगुरू हिला चित्रपटात काम करण्याची संधि दिली होती.