Articles Celebrities Entertainment Movies

‘न शे च्या’ धुंदीत ट्विंकलने संलमान सोबत केले हे चुकीचे काम ,मग रागाच्या भरात अक्षय कुमार ने उचलले हे पाऊल

Sharing is caring!

बॉलीवुड आणि तेथील मैत्री असो किंवा वैर यांची नेहमीच चर्चा केली जाते. बॉलीवूडच्या पार्ट्यामध्ये तर असे किस्से होतात की त्यामुळे अनेकांचे वर्षानुवर्षाचे वैर निर्माण होते. असेच काही सलमान आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये झाले होते. काही वर्षांपूर्वी अर्जुन कपूर सलमान खानची बहीण अर्पिता हिल डेट करत होता.

अर्पिता ही सलमानची सर्वात लहान आणि लाडकी बहीण. अर्जुनचा एकदा बर्थ डे होता आणि त्या बर्थ डे पार्टीला अर्जुनने सर्वाना बोलविले होते. अक्षय कुमारची बायको अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील या पार्टीला उपस्थित होती. ट्विंकलला बर्थ डे पार्टीत दा रू पीवून नाचायला प्रचंड आवडते. त्या दिवशी देखील तिने प्रचंड दा रू प्यायली आणि नाचू लागली.

त्या पार्टीला सलमान देखील आला होता. ट्विंकलने सलमान सोबत डान्स करण्याचा हट्टच धरला पण सलमान मात्र काही केल्या तयार नव्हता. परंतु ट्विंकल मात्र काही केल्या एकत नव्हती शेवटी सलमानने तिच्या सोबत डान्स केला. ही बातमी मीठ -मिरची लावून अक्षय पर्यन्त पोहचली अक्षय प्रचंड चिडला आणि सरळ दुसऱ्या दिवशी सलमानच्या घरी म्हणजेच गॅलक्सी इमारतीत जाऊन पोहचला, आणि सलमानला जाब विचारू लागला.

तू ट्विंकल सोबत डान्स कसा काय केला. तुझी हिम्मत तरी कशी झाली. सलमान आणि अक्षय यांच्यातील भांडण खूप पेटले. दोघे ही माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी सलमानचे वडील सलीम खान शेवटी बाहेर आले आणि त्यांनी सलमान आणि अक्षय यांना शांत राहण्यास संगितले. सलीम यांनी सलमानला त्याच्या खोलीत जाण्यास संगितले आणि अक्षयला देखील समजावले. शेवटी अक्षय घरी निघून गेला. अशा प्रकारे सलमान आणि अक्षय यांच्या मोठे कडाक्याचे भांडण होता – होता राहिले.