Articles Celebrities Entertainment Movies

या मराठी अभिनेत्यांचा अवघ्या 15 मिनिटांचा रोल , अक्षय कुमारवर देखील पडला भारी..

Sharing is caring!

अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट नुकताच डिजिटल माध्यमांवर रिलीज झाला. चित्रपटाला हवा तितका प्रतिसाद देखील मिळाला नाही. अनेक दिवसापासून सर्व प्रेक्षकांना अक्षयच्या या चित्रपटाची खूप उत्सुकता होती परंतु , प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला. चित्रपट जरी प्रेक्षकांना तितकासा आवडला नसला तरी एक भूमिका अवघ्या 15 मिनिटांची असून देखील ती सर्व प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप टाकून गेली.

अक्षय कुमारला देखील या बाबतीत या भूमिकेने मागे टाकले. हा अभिनेता दूसरा तिसरा कोणी नसून हा अभिनेता म्हणजे शरद केळकर. लक्ष्मी हा चित्रपट तृतीय पंथी यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट असून यामध्ये शरद याने लक्ष्मी हे पात्र रंगविले आहे. नाव चित्रपटांचे लक्ष्मी जरी असले तरी शरद ला अवघ्या 15 मिनिटांचा रोल वाट्याला आला होता.

शरदने तो रोल इतक्या उत्तमपण निभावला की लोकांना ती भूमिका जबरदस्त आवडली. शरदने या रोलसाठी प्रचंड मेहनत घेलती होती. आवाज कसा असावा. संवाद कसे बोलावेत हे सर्व तो पुन्हा नव्याने शिकला. डायलॉग डिलीवरी आणि परफेक्ट टाइमिंग या जोरावर हा चित्रपट पूर्ण केला.

शरद यानी अनेक हिन्दी , मराठी या सारख्या अनेक चित्रपाताट भूमिका साकारल्या आहेत. सात फेरे: सलोनी का सफर’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एजेंट राघव’ यासारख्या अनेक मालिका मध्ये शरद ने काम केले आहे.