कधीतरी तोंड येणे ही अतिशय सामान्य बाब आहे. प्रत्येकाला असे होत असते. मात्र, सतत तोंड येणे किंवा खाण्यापिण्यासाठी सुद्धा त्रास होणे या प्रकारच्या अडचणींची अनेक कारणे असू शकतात. आपण आज त्यावर उपाय आणि त्याची कारणे शोधणार आहोत!

मुलींमध्ये हार्मोनल इनबॅलन्स चा त्रास सुरू झाला, किंवा मासिक पाळी मध्ये समस्या सुरू झाली आणि त्या काळात जर तोंड येत असेल तर यामागे हॉर्मोन्स किंवा तुमच्या मासिक पाळीच्या चक्राची कारणे असू शकतात. याकाळात वाढणारी उष्णता आणि पाळी पुढे ढकलणे याने होणारा त्रास यामुळे तोंडाचा अल्सर किंवा तोंड येणे हा प्रकार होऊ शकतो.

बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा पोटातील उष्णता वाढल्याचे जाणवत असेल तर तोंड येणे हा प्रकार अतिशय सामान्य आहेत. मात्र हा आजार किंवा ही समस्या व्यवस्थित करण्यासाठी मध हे अँटीबॅक्टेरियल म्हणून उपयुक्त ठरू शकते. ज्या ठिकाणी तोंड आले आहे तिथे मध लावल्याने लवकरच आराम मिळू शकतो.

खोबर्‍याचे तेल किंवा नारळाचे तेल अनेकदा यावर उपयुक्त ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हे तेल तोंड आलेल्या ठिकाणी लावले तर, तिथे असणाऱ्या जंतूंचा नाश होऊन आराम मिळू शकतो.

1 ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात मीठ घातले आणि गुळण्या केल्या तरीदेखील दिवसातून दोन-तीन वेळा असे केल्याने तोंड जाऊ शकते.

लवंगाचे तेल देखील यामध्ये उपयुक्त ठरते. फक्त तोंड येण्याची समस्याच नाही तर, दात दुखीवर सुद्धा हे तेल उपयुक्त आहे.

ब्रश करण्यासाठी लागणारी टूथपेस्ट सुद्धा अँटीमायक्रोबियल गुणधर्म घेऊन येते. त्यामुळे वेदना किंमत जळजळ होणारी कोणतीही गोष्ट यामुळे बरी होऊ शकते. तोंडाच्या समस्येवर टूथपेस्ट लावणे आणि थोड्यावेळाने पाण्याने व्यवस्थित चूळ भरणे याने तात्काळ आराम मिळू शकतो.