ताजमहाल बद्दल माहित नसलेल्या ‘या’ ८ गोष्टी वाचून चकित व्याल!

ताजमहाल बद्दल माहित नसलेल्या ‘या’ ८ गोष्टी वाचून चकित व्याल!

संपूर्ण जगभरामध्ये अमर प्रेमाचा दाखला देण्यासाठी ताजमहालचे उदाहरण हे आवर्जून दिले जाते. आपल्या प्रिय पत्नीच्या विरहामध्ये तिच्या स्म्रूतीसाठी चिरंतन अशी वास्तू म्हणजे ताजमहल उभारण्याचे काम शहाजहानने केले होते. आज सुद्धा संपूर्ण जगभरामध्ये आठ आश्चर्यांमध्ये ताजमहालाचा नंबर लागतो व या अमर प्रेमाच्या प्रतिकाला पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी ताजमहालला भेट देत असतात .

ताजमहाल हे केवळ प्रेमाचे प्रतीक म्हणून नव्हे तर एक उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून सुद्धा युनेस्कोने दखल घेतलेले स्मारक आहे. ताजमहालचे सौंदर्य, स्थापत्यशास्त्र मधील अचूकता व या ठिकाणच्या परिसराची आखणी हे सर्वच काही अगदी अनोखे आहे. म्हणूनच ताजमहालची निर्मिती ही एक प्रकारचे रहस्य मानले जाते .ताजमहालाशी निगडीत अनेक कथा व मिथक आजही आवर्जून सांगितले जातात. आज आपण ताजमहालची निगडीत अशाच काही तथ्यांविषयी  जाणून घेणार आहोत.

1) बादशाह शहाजहान याने आपली प्रिय पत्नी मुमताज महल च्या मृत्यूनंतर तिच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून 1632ते  1647 या प्रदीर्घ कालावधी मध्ये ताजमहाल बांधण्याचे काम केले.मुमताज महलचा आपल्या चौदाव्या अपत्याला जन्म देताना मृत्यू झाला होता. तिच्या विरहा मध्ये शहाजहानने ताजमहालची बांधणी केली.

 2) ताजमहल ची निर्मिती करण्यासाठी हुषार आणि कुव कारागीर नेमण्यात आले होते. ते अतिशय उत्कृष्ट व हुशार असे कारागीर होते .त्यांनी निरनिराळ्या क्लृप्त्या वापरून ताजमहल ला जगामध्ये सर्वात वेगळे असे स्मारक बनवले. अशा स्मारकाची निर्मिती पुन्हा होऊ नये यासाठी शहाजहानने ताजमहाल चे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणार्‍या सर्वच कारागिरांचे हात छाटले व त्यांचे डोळे सुद्धा काढून टाकले असे सांगितले जाते. मात्र या दाव्याला पुष्टी देणारे संदर्भ इतिहास किंवा साहित्यात आढळून येत नाही .ज्यावेळी या कारागिरांचे हात काढले जात होते त्यावेळी एका कारागिराने या ताजमहालमध्ये मुमताज महलच्‍या समाधीच्या वरच्या भागावर अशा पद्धतीने छिद्र पाडले की यामधून पावसाच्या वेळी पाण्याचे थेंब बरोबर त्या समाधीवर पडतील मात्र हे छिद्र सापडण्या मध्ये आज पर्यंत यश मिळालेले नाही.

3) बु-हाणपूर काही काळ मोगलांच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले.मुमताज महलचा आपल्या चौदाव्या अपत्याला जन्म देते वेळी मृत्यू झाला. त्यावेळी मुमताज महलचे पार्थिव बुऱ्हाणपूर मध्येच पुरण्यात आले होते मात्र त्यानंतर हे पुन्हा एकदा काढून ताजमहल च्या परिसरात पुरण्यात आले.

4) ताजमहाल मध्ये मुमताज महल आणि शासजहान यांच्या समाधी स्थळाना अतिशय अमुल्य अशा व ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. ताजमहालमधील समाधी स्थळांच्या ठिकाणी प्रत्यक्षात मुमताज महल आणि शहाजहान यांचे पार्थिव ठेवण्यात आलेले नव्हते .हे दोन्ही समाधी स्थळ केवळ दिखाव्यासाठी आहेत. प्रत्यक्षात शहाजहान आणि मुमताज महल यांना ताजमहालच्या परिसरात असलेल्या बगीच्यामध्ये दफन करण्यात आले होते.

5) ताजमहाल हे शुभ्र अशा मार्बल द्वारे बांधण्यात आले होते. मात्र वाढते प्रदूषण आणि यमुना परिसरातील कारखान्यांचे वाढते प्रस्थ ,वायू प्रदूषण यामुळे ताजमहालच्या मूळ रंगावर विपरीत परिणाम झाला व ताजमहालच्या पांढऱ्याशुभ्र रंगावर पिवळसर तपकिरी रंगाची छटा दिसू लागली. ताजमहालचे सौंदर्य यामुळे काहीसे धुसर बनू लागले. ताजमहालाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी हा थर काढून टाकायला प्रक्रिया करण्यात आल्या .यापैकी केल्या गेलेल्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे अगदी पुरातन काळापासून संपूर्ण जगभरामध्ये सौंदर्याला उजाळा देण्यासाठी वापरण्यात आलेल्या मुलतानी मातीचा वापर केला गेला व या निरनिराळ्या उपायांद्वारे पुन्हा एकदा ताजमहालचा मूळ रंग दिसू लागला.

6) ताजमहालच्या वैशिष्ट्ये आणि सौंदर्याचे अजून एक अंग म्हणजे सकाळी दिवस उजाडल्यापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत ताजमहालच्या रंगांमध्ये वेगवेगळ्या छटा दिसून येतात जसे की सूर्योदयाच्या वेळी ताजमहालचा रंग हा मोत्या सारखा व गुलाबीसर छटेचा दिसतो तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हा रंग आकाशी निळा प्रमाणे भासतो.

7) असे सांगितले जाते की ताजमहाल प्रमाणेच काळया रंगांमध्ये मार्बलचे दुसरे एक स्मारक शहाजहान यमुनेच्या काठावर स्वतःच्या समाधी स्थळासाठी बांधू इच्छित होता मात्र त्याचा हा मानस पूर्ण झाला नाही कारण औरंगजेबाने  मुमताज महलचा सातव्या पुत्राने शहाजहान ला त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त करून ठेवले होते.

8) ताजमहाल ला प्रेमाचे प्रतीक मानले जात असले तरीही काही इतिहासकारांच्या मते शहाजहान हा रसिक वृत्तीचा नव्हता तर दबाव टाकणारा सत्तांध वृत्तीचा होता. यामुळे ताजमहाला द्वारे त्याने एक प्रकारचा मुघल साम्राज्याचा वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतक्या भव्यदिव्य शिल्पा द्वारे त्याने मोगलांच्या सामर्थ्याची जाणीव संपूर्ण जगाला करून दिली. त्यामुळे ताजमहाल हे जितके प्रेमाचे प्रतीक मानले जाते तितके सत्तावान सामर्थ्याचे प्रतीक सुद्धा आहे.

beingmarathi