Articles Celebrities Entertainment Movies

गौरी चल लवकर बुरखा घाल आणि नमाज पढ जेव्हा शाहरुख खान गौरीला बजावतो ..

Sharing is caring!

शाहरुख खान बॉलीवूड मधील बादशाह समजला जातो. शाहरुख आणि गौरी खान ही बॉलीवुडमधील एक हीट जोडी आहे. शाहरुख गौरीवर प्रचंड प्रेम करतो अनेक कार्यक्रमामध्ये देखील तो गौरीचे भरभरून कौतुक करतो. गौरी देखील त्यांच्यावर तितकेच करते. दोघांच्या लग्नाला आता २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे दोघे अजून देखील तितकेच प्रेम करतात. शाहरुख आणि गौरी यांचा प्रेम विवाह असून आंतरजातीय विवाह आहे.

त्यामुळे त्यांच्या लग्नाची अजून देखील तितकीच चर्चा होते. आता असाच एक किस्सा समोर येत आहे. शाहरुख खान याने एका मासिकला मुलाखत दिली त्यामध्ये त्याने ही आठवण संगितली. शाहरुख आणि गौरी यांचे लग्न झाले. लग्नंनंतर एक रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला गौरीच्या घरचे देखील सर्व उपस्थित होते. तेव्हा गौरीच्या काही पाहुण्यांमध्ये हळू -हळू काही कुजबूज चालू होती. ते हळू -हळू खूप चर्चा करत होते. ती चर्चा शाहरुखच्या कानापर्यंत आली. आता गौरीला हे लोक धर्म बदलायला लावतील , तिचे नाव देखील बदलतील, तिला बुरखा घालायला लावतील. अशी हळुहळू कुजबूज चालू होती.

शाहरुखने जेव्हा ही कुजबुज समजली तेव्हा तो अचानक खूप सीरियस झाला आणि गौरीला ओरडू लागला. गौरी चल लवकर बुरखा घाल आणि नमाज पढ शाहरुख अचानक असा बोलल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. अरे आपण आताच चर्चा केली आणि हा मुलगा लगेच तिला धर्म आणि नाव बदलायला सांगत आहे. हे लोक असे असतात. गौरी देखील काही वेळ शॉक झाली शाहरुख बरा तर आहे ना ? असं का बोलत आहे. दोन मिनिटे गेल्या नंतर शाहरुख शांत झाला आणि हसू लागला. तेव्हा सर्वाना समजले शाहरुख गमंत करीत आहे. शाहरुख तेव्हा गमंतीत गौरीला म्हणाला होता की तुझ नाव आता आयशा असेल आणि तू नेहमी बुरखा घालूनच बाहेर पडायचे. या नंतर शाहरुख ने संगितले की आपण इतक्या पुढारलेल्या समाजात राहतो आणि असा विचार करतो हे अत्यंत चुकीचे आहे.आज २५ वर्षा नंतर गौरीच्या संपूर्ण परिवारात मी सर्वांचा लाडका झालो आहे.