पुरुष व महिलानी अंतर्वस्त्र का परिधान करावीत? जाणून घ्या यामागची कारणे

आपण निरनिराळ्या प्रकारचे कपडे परिधान करत असतो. स्त्री, पुरुष ,लहान मुले, वृद्ध व्यक्ती या सर्वांसाठी त्यांना साजेसे व आरामदायी वाटणारे असे निरनिराळ्या प्रकारचे कपडे वापरले जातात. बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी कपड्यांची प्रमुख भूमिका असते . कपड्यांचा वापर आपण करत असताना अंतर्वस्त्र हीसुद्धा खूपच महत्वाची मानली जातात.अंतर्वस्त्र परिधान करणे हे स्त्री, पुरुष, लहान मुले, वृद्ध व्यक्ती या सर्वांसाठी जणूकाही अगदी बंधनकारकच मानले जाते व ही अगदी फार पूर्वीपासूनची परंपराच बनली आहे. अंतर्वस्त्र सध्या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या फँशनमध्ये येत असतात. कमी किमतीची व महागडी अशी दोन्ही प्रकारची अंतर्वस्त्र सध्या बाजारात उपलब्ध आहेत. अंतर्वस्त्र परिधान करणे का बंधनकारक व आवश्यक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.
1) अंतर्वस्त्र परिधान करण्याची परंपरा ही सात हजार वर्षे इतकी जुनी आहे. त्याकाळी पुरुष कमरेच्या खाली चामड्या पासून बनवलेला एक पट्टा गुंडाळत असत यामागचा हेतू असा असे की धावतांना या पट्ट्यामुळे वेग वाढवला जात असे.
2) क्रोच रोट संसर्गापासून संरक्षणः आपल्या गुप्तांगाला घाम, ओलावा इत्यादीमुळे क्रोच रोट या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या ठिकाणची त्वचा ओली किंवा घामेजलेली राहू देऊ नये.अंतर्वस्त्रे सुद्धा कधीही ओली असताना परिधान करू नये असे सांगितले जाते. अंतर्वस्त्रांचा मुख्य फायदा म्हणजे या ठिकाणच्या त्वचेमध्ये निर्माण झालेला घाम ओलावा अंतर्वस्त्रा द्वारे टिपून घेतला जातो. व हा घाम आपल्या बाहेरील कपड्यांपर्यंत पोहोचू दिला जात नाही.
३) कमरेखालील वस्त्रांवर उन्हाळा किंवा वातावरणातील उष्णतेमुळे घाम निर्माण होतो. हा घाम अंतर्वस्त्रांद्वारे शोषून घेतला जातो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना लज्जित व्हावे लागत नाही. त्याचप्रमाणे मल मूत्रविसर्जन करताना निर्माण झालेला ओलावा सुद्धा अंतर्वस्त्रा द्वारे टिपून घेतला जातो. आपल्या खाजगी अंगांना सुरक्षितपणे झाकून ठेवण्यासाठी अंतर्वस्त्रांचा वापर करणे खूपच आवश्यक आहे.
४) धार्मिक ठिकाणी स्नान करणे किंवा ट्रेक ,सहली इत्यादीचे ठिकाणे सार्वजनिक ठिकाणी स्नान करण्याची आवश्यकता निर्माण होते. पुरुष मंडळींनी अंतर्वस्त्र परिधान केलेली असतात त्यामुळे सहजपणे सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणे सोपे जाते.
५) सध्या निरनिराळ्या प्रकारच्या कापड आणि आकारांचे अंतर्वस्त्रे बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये आपल्याला आरामदायी वाटतील अशी अंतर्वस्त्रे आपण निवडू शकतो। बॉक्सर अंतर्वस्त्रे ही पुरुषांसाठी जास्त आरामदायी मानली जातात कारण ती सैल व मऊ प्रकारची असतात ज्यामुळे त्वचेवर घाम निर्माण होत नाही. आणि जास्त घट्ट अंतर्वस्त्र परिधान करून एकाच ठिकाणी जास्त वेळ कामासाठी बसले असता स्पर्म काउंट देखील कमी होतो असे काही जणांमध्ये दिसून आले आहे. त्यासाठी बॉक्सर अंडरवेअर हा एक खूप चांगला पर्याय ठरतो मात्र पोहण्याच्या कपड्यां मध्ये बॉक्सर तितक्याशा आरामदायी नसतात.

६) ब्रीफ अंडरवेअर बॉक्सरः बाँक्सर अंडरवेअर प्रमाणे सध्या अनेक पुरुष ब्रीफ अंडरवेअर या आधुनिक पद्धतीच्या डिझाईनच्या अंतर्वस्त्रांच्या पसंती देताना दिसतात. फक्त आपल्या खाजगी अवयवांना झाकण्या इतकाच कपडा वापरलेला असतो व यामुळे ते आकर्षक सुद्धा वाटते। खाजगी अंगाव्यतिरिक्त अन्य त्वचा झाकलेली नसल्यामुळे त्वचा विकारांची समस्या सुद्धा दूर होते. तसेच पुरुषांच्या खाजगी अवयवांना कोणत्याही प्रकारच्या आघाता पासून वाचवण्यासाठी अवयवाच्या आकाराची विशिष्ट अशी रचना सुद्धा या अंडरवेअर मध्ये केलेली असते.
ज्याप्रमाणे अंतर्वस्त्र घालण्याचे फायदे असतात अगदी त्याचप्रमाणे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा रात्रीच्या वेळी झोपण्याच्या वेळेस अंतर्वस्त्र न घालण्याचे सुद्धा काही विशिष्ट असे फायदे सांगितले जातात. अंतर्वस्त्र न घालण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेतः
१) हवा खेळती राहणेः रात्रीच्या वेळेस झोपण्याच्या वेळी अंतर्वस्त्र घालू नयेत असे सांगितले जाते. दिवसभर त़ंग कपड्यांमध्ये घट्ट कपड्यांमध्ये वावरत असताना आपल्या जननेंद्रियांचे मध्ये ओलावा घाम आलेला असतो.त्यामुळे अंतर्वस्त्र काढली असता या ठिकाणी हवा लागून विषाणू किंवा जीवाणू यांच्या संक्रमणास प्रतिबंध केला जातो.
२) संसर्गापासून सुरक्षाः आपण रात्रीच्यावेळी अंतर्वस्त्र काढून ठेवले पाहिजे त्यामुळे आपल्या त्वचेला हवा लागून त्या ठिकाणी घाम शोषलाजातो व यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते.
३) पुरळ आले असल्यास आरामः जननेंद्रियांचे ठिकाणी काही विषाणूंच्या संक्रमणामुळे पुरळ एलर्जी अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार तर करावेत पण रात्री औषधे लावल्यानंतर अंतर्वस्त्र परिधान करून झोपू नये.
४) गजकर्णापासून आरामः गजकर्ण यासारख्या समस्या लवकर पिच्छा सोडत नाही .अशा आजारांचे जननेंद्रियांच्या ठिकाणी जिथे अंतर्वस्त्र परिधान केले असते तिथे हवा ,प्रकाश इत्यादींचा अभाव असतो अशा वातावरणामध्ये जास्त वेगाने फैलाव करतात। म्हणूनच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोपर्यंत गजकर्ण पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत अंतर्वस्त्र परिधान करू नये.
५) खाजेच्या त्रासापासून सुटकाःदिवसभर काम करत असताना अंतर्वस्त्रांच्या वापरामुळे पाय ,मांड्या इत्यादींच्या सततच्या घर्षणामुळे खाज येणे, चालताना त्रास होणे इत्यादी समस्या उद्भवतात. यासाठी अंतर्वस्त्र परिधान करू नये.
६) आरामदायी ःरात्री झोपतेवेळी अंतर्वस्त्र काढून टाकले असता खूप आरामदायी वाटते व यामुळे झोप सुद्धा चांगली लागते.
७) अंतर्वस्त्र योग्यवेळी बदलणेः खूपदा अंतर्वस्त्र जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत नवीन अंतर्वस्त्र घेतली जात नाहीत. मात्र यामुळे जीवजंतूंचे संक्रमण होण्याचा धोका निश्चितच वाढतो यामुळे योग्य वेळी अंतर्वस्त्र बदलून नवीन अंतर्वस्त्र घालण्यास सुरुवात करा.