अंकिता लोखंडे अडकली लग्नाच्या बेडीत, महाराष्ट्रीयन लूक मध्ये दिसली खूपच आकर्षक

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत मध्ये पोहोचली होती. पवित्र रिश्ता या मालिकेप्रमाणेच सध्या सुरू झालेल्या पवित्र रिश्ता दोन या मालिकेमध्ये सुद्धा अंकिता आपल्या अभिनयाची कमाल दाखवत आहे. मात्र आपल्या मालिका किंवा अभिनयापेक्षा अंकिता तिचा प्रियकर विकी जैन यांच्या सोबत च्या लग्नाचा चर्चांमुळे सध्या प्रकाश झोतात आहे.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते व ती नेहमीच आपले व्हिडिओज आणि छायाचित्रांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.अंकिता लोखंडे मीडियावर खूप काळापासून आपला प्रियकर विकी जण सोबतची छायाचित्रे शेअर करत असते. कॅमेरा समोरही हे दोघे एकमेकांना किस करताना रोमँटिक अंदाजात दिसून आले आहेत.
अंकिता आणि विकी यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. अंकिता आणि विकी च्या हळदी आणि मेहंदीचे छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये या दोघांना खूपच आनंदात बघितले गेले आहे . अंकिता ने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी मध्ये सुद्धा भाग घेतला आहे . अंकिता ला विवाहाच्या अगोदर एक छोटासा अपघात घडला होता त्यामुळे तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते तरी तिच्या लग्नाच्या सोहळ्या मधील आनंद तसूभर कमी झालेला दिसून आला नाही.

अंकिता व विकी जैन यांनी स्वतः सर्व मित्र-मैत्रिणींना व जवळच्या व्यक्ती घरी जाऊन स्वतः लग्नाचे आमंत्रण दिले. हळदीच्या वेळी अंकिता महाराष्ट्रीयन लूक मध्ये खूपच आकर्षक दिसत होती व मेहंदीच्या कार्यक्रमांमध्ये या दोघांनीही अगदी दिलखुलासपणे डान्स केला.