आमिर खानची मुलगी इरा पुन्हा एकदा प्रेमात, वडिलांच्या फिटनेस कोचला करते डेट…!

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अमीर खान प्रमाणे त्याची मुलगी ईरा खान सुद्धा नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्या साठी चर्चेत असते. इरा खान हि आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता हिची मुलगी आहे. इरा खान ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते व त्यातूनच तिने केलेल्या पोस्ट आणि छायाचित्रांना चाहत्यांकडून ज्याप्रमाणे प्रसिद्धी मिळते अगदी त्याचप्रमाणे त्यावर अनेकदा ट्रोल सुद्धा होतात.
मध्यंतरी इरा चांगलीच चर्चेत होती ते तिने आपल्या लहानपणी आपले लैंगिक शोषण झाल्याबद्दल माहिती असणा-या पोस्टमुळे व कशाप्रकारे तिने डिप्रेशन चा सामना केला हे सांगणा- या पोस्टमुळे. आता पुन्हा एकदा इरा चर्चेत आली आहे ते तिच्या आयुष्यात घडलेल्या एका गुड न्युजमुळे.
अमीर खान चा सेलिब्रिटी फिटनेस कोच नुपुर शिखर सोबत इरा डेट करत आहे व हे दोघे सुद्धा या रिलेशनशिप बाबतीत खूपच गंभीरपणे विचार करत असून नुपूरने नुकतीच इराच्या आईची यासंदर्भात भेट सुद्धा घेतली आहे.काही दिवसांपूर्वी इराचे तिचा गेल्या दोन वर्षांपासून डेट करत असलेल्या प्रियकर मिशाल कृपलानी ब्रेकअप झाले होते.
या ब्रेकअप नंतर इरा खूपच दुःखी होती मात्र या नवीन रिलेशनशिपमुळे ती सध्या खूपच आनंदात आहे व नुपुर शेखर सोबत ती नुकतीच महाबळेश्वर येथील खान फार्म हाऊस वर सुट्ट्या सुद्धा व्यतीत करून आलेली आहे.या सुट्ट्यांमध्ये या दोघांच्या आईसुद्धा त्यांच्यासोबत होत्या व एकंदरीतच दोन्ही कुटुंबीयांना या नात्याबद्दलकोणतीही तक्रार नाही.

इराला आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये रस नसून निर्माता व दिग्दर्शन यांमध्ये तिला आपले करिअर करायचे आहे.इराने या दृष्टीने आपले करिअर सुद्धा सुरू केले आहे.मिशाल क्रुपलानी सोबत ब्रेकअप करणयामागचे मुख्य कारण म्हणजे इरा आपल्या करिअरवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करत असे त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद होत असत व यामुळे परस्पर सामंजस्याने त्यांनी हे संबंध संपुष्टात आणण्याचे ठरवले .
नुपुर शेखर सोबत ची भेट तिच्या फिटनेसवर लक्ष देण्याच्या निर्णयानंतर झाली.नुपूर हा सेलिब्रिटी कोच म्हणून चांगलाच प्रसिद्ध आहे .तो अमीर खान,सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतो.