‘एकता कपूरला’ २२ व्या वर्षी करायचं होत लग्न, यशाच्या नशेत ४६ व्या वर्षीही आहे अविवाहित!

टेलिव्हिजन ची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर ने नुकताच आपला शेहचाळीसवा वाढदिवस साजरा केला आहे. एकता कपूर बालाजी प्रोडक्शन या आपल्या प्रोडक्शन हाऊस मार्फत मालिका व चित्रपटांचे निर्माण करते. आत्तापर्यंत एकताने प्रेक्षकांना अनेक मनोरंजक अशा आशयाच्या चित्रपट व मालिका दिल्या आहेत.
एकता कपूर आपल्या कामामध्ये इतकी व्यस्त असते की तिला वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतःसाठी देण्यासही वेळ नाही व यामुळेच तिला तिच्या विवाहाचा विचार करण्यासही कधी वेळ मिळाला नाही असे सर्वांनाच वाटते.मात्र एक काळ असा होता जेव्हा एकताला सर्वसामान्य मुलींप्रमाणे लग्न करायचे होते स्वतःचा संसार थाटायचा होता मात्र असे काय झाले ज्यामुळे तिने आपले हे स्वप्न दूर सारले.
एका मुलाखतीमध्ये एकताने स्वतः याबाबत खुलासा केला की तिचे वडील जितेंद्र यांनी तिला जेव्हा ती सतरा वर्षांची होती तेव्हा सांगितले की एकतर तू लग्न कर आणि स्वतःचा संसार कर किंवा पार्टी करण्यापेक्षा तू स्वतः कमाव असे मला वाटते.जितेंद्र यांनी सतराव्या वर्षीच एकताला अगदी स्पष्टपणे सांगितले होते की ते तिला तिच्या महिन्याच्या पॉकेटमनी शिवाय अन्य कोणतीही सुविधा देणार नाही, तिला स्वतःलाच कमवावे लागेल. वडिलांचा हा सल्ला मानून तिने एका एड एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हे काम करण्यास सुरुवात केल्यानंतर एकति आपल्या आयुष्याबाबत समाधानी होती व तिला माझ्या बाबतीत सर्व काही ठीक होईल असे वाटू लागले होते.तिला वयाच्या बाविसाव्या वर्षी लग्न करायचे होते व आपले आयुष्य एंजॉय करायचे ठरवले होते. मात्र आपण जसे ठरवतो तसे सर्व काही होत नाही असे एकता सांगते.बाविसाव्या वर्षी विवाहासाठी इच्छुक असलेल्या एकताने अद्याप विवाह केलेला नाही. 2019 साली सरोगसीच्या माध्यमातून ती एका मुलाची आई झाली आहे.एकताने आपल्या मुलाचे नाव रवी असे ठेवले आहे.

जितेंद्रसारख्या सुपरस्टार ची मुलगी असूनही सुरुवातीच्या काळामध्ये तिने खूप संघर्ष केला. द फ्रेश प्रिन्स ऑफ बेल एअर या अमेरिकन शो प्रतीच्या प्रेमापोटी तिने या शोची ऑफर घेतली व तिच्या मनामध्ये ज्या कल्पना होत्या त्याच्या आधारे तीन ते चार पायलेट एपिसोड करण्याचे त्यांनी ठरवले.नेमके या काळामध्ये एशिया टीव्ही झी टीव्हीला विकण्यात आले व यामुळे नंतर ही मालिकेची कल्पना डब्यात गेली व हे सॉफ्टवेअर विकत घेण्यास कोणीही तयार होत नव्हते.त्यामुळे त्या काळात एकताचे लाखोंचे नुकसान झाले.

गुंतवणुकीमध्ये झालेल्या या तोट्याच्या अनुभवानंतर एकताने हम पांच या आज सुद्धा लोकप्रिय असलेल्या मालिकेची निर्मिती केली व या पायलट शूट केलेल्या मालिकेला झी टीव्हीला विकले. ही मालिका जेव्हा ऑन एअर गेली तेव्हा ती प्रचंड लोकप्रिय झाली. यावेळी एकताचे वय अवघे 19 वर्षांचे होते. ही मालिका लोकप्रिय झाल्यानंतर एकता वर प्रोडक्शन हाऊस मार्फत नवनवीन प्रयोग करण्याचे जणूकाही वारू संचारले.तिच्या काही मालिका यशस्वी ठरल्या तर काही अपयशी ठरल्या मात्र यामुळे ती खचून गेली नाही व पुन्हा जोमाने कामाला लागत गेली.