ऐश्वर्याच्या चित्र विचित्र वागण्यामुळे ‘बिग-बी’ ला व्हावे लागले सगळ्यांसमोर शरमिंदा…!

ऐश्वर्याच्या चित्र विचित्र वागण्यामुळे ‘बिग-बी’ ला व्हावे लागले सगळ्यांसमोर शरमिंदा…!

संपूर्ण जगामध्ये कोरोना थैमान घालत आहे. कोरोनाच्या महामारीसोबत जगावर लॉकडाऊनचे संकट  आले आहे त्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये प्रचंड प्रमाणात बदल घडून आले आहेत. अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. आर्थिक दृष्ट्या लोक हतबल झाले आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये बॉलीवूड व टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांना सुद्धा अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. काही कलाकार मात्र या काळामध्ये गरजूंना मदत करतांना सुद्धा दिसून येत आहे.

सध्या पुन्हा एकदा सरकारने चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण करण्याची परवानगी दिल्यामुळे अनेक सेलिब्रिटी आपापल्या कामांवर व चित्रीकरणाच्या ठिकाणी परतले आहेत. या सर्व लॉक डाऊन च्या काळामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चे जुने फोटो व व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत व त्यावर चाहत्यांनी चित्रविचित्र कमेंट सुद्धा दिले आहेत. असाच एक व्हिडिओ बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन व त्यांची लाडकी सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्या बाबतीत व्हायरल झाला आहे.

या दोघांच्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याच्या चित्र विचित्र वागण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बीग बी चांगलेच शरमिंदा झाल्याचे दिसून येत आहे व त्यांनी त्यावेळी नाराज होऊन तिला सुनावले सुद्धा आहे .हा सर्व व्हिडिओ नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया. 2016 साली एका पुरस्कार सोहळ्यामध्ये बीग बी आपल्या सुनेसोबत हजर राहिले होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बीग बी पुरस्काराचे मानकरी सुद्धा ठरले होते.

या पुरस्कार सोहळ्याच्या सांगतेनंतर पत्रकारांनी अमिताभ बच्चन यांना घेरले व त्यांच्यावर प्रश्नोत्तरांचा भडिमार केला यावेळी पत्रकारांना अगदी शांतपणे उत्तर देत असलेल्या बीग बी यांच्यासोबत असलेली ऐश्वर्या राय-बच्चन मात्र जरा जास्तच एक्साईट होती.एक्साइटमेंटच्या भरामध्ये ती खूप विचित्रपणे हावभाव करत होती व तिला वेळेचे भान नसल्याचे दिसून येत होते. ती खूप जोरात हसत होती व अमिताभ बच्चन यांच्या गळ्यात पडत होती.

अमिताभ बच्चन या  सर्व प्रकाराने पत्रकारांसमोर शरमिंदा झाले व त्यांनी ऐश्वर्याला आराध्या सारखे वागू नकोस असे सुनावले‌. यावर ऐश्वर्या अधिकच जोर जोरात हसू लागली. या सर्व प्रकारांमध्ये अमिताभ बच्चन खूपच संकोची झाल्यासारखे दिसून येत आहे. बच्चन परिवाराची लाडकी सून असलेली ऐश्वर्या राय बच्चन ही 1973 साली मंगलोर येथे जन्म झाला. खूप सुंदर असलेल्या ऐश्वर्याने 1991 साली थायलंड येथे आयोजित केलेल्या सुपरमॉडेल स्पर्धेमध्ये पदक पटकावले होते व यानंतर तिला अमेरिकेन एडिशन च्या वोग मासिका मध्ये कव्हरपेजवर झळकण्याची संधी मिळाली होती.

1993 साली ऐश्वर्या आमिर खान सोबत एका शीतपेयाच्या जाहिरातीमध्ये झळकली होती व ही जाहिरात त्यावेळी चांगलीच लोकप्रिय झाली होती. 1994 साली ऐश्वर्या राय ने मिस वर्ल्डचा किताब जिंकला व त्यानंतर तिने बॉलीवूडची वाट धरली. इरूवर या दाक्षिणात्य चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. हा चित्रपट मनिरत्नम या दिग्गज दिग्दर्शकाने निर्माण केला होता. यानंतर और प्यार हो गया या चित्रपटांमध्ये तिने बॉबी देवल सोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही. 2006 साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत विवाह केला. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या ही मुलगी सुद्धा आहे.लग्ना नंतर ऐश्वर्या काही मोजक्या चित्रपटांमध्ये दिसली. आपल्या कुटुंबीयांसोबत ऐश्वर्या नेहमीच विविध समारंभांमध्ये एकत्र दिसून येते. अमिताभ बच्चन हे सध्या ब्रह्मास्त्र यांसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात मध्ये व्यस्त आहेत. ऐश्वर्या एका दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये येत्या काही काळात दिसून येणार आहे.

beingmarathi

Related articles