कधी काळी कामासाठी दारोदार फिरणारी ‘ही’ अभिनेत्री आता आहे ‘कोट्यावधींची’ मालकीण….

समंथा रूथ प्रभू टाँलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे .समंथा ही दक्षिण भारतीय चित्रपटांमधील यशस्वी आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. समंथाच्या लाईफस्टाईल, फॅशन स्टेटमेंट नेहमीच चर्चेत असते. समंथाचे लाईफस्टाईल ,कपडे ,हेअर स्टाईल त्यांना तरुणींकडून नियमित फॉलो केले जाते समंथा ही नागार्जुन या जेष्ठ अभिनेत्याची सून असून नाग चैतन्य या अभिनेत्याची पत्नी आहे.
आज अक्षरशः कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण असलेली समंथा कधीकाळी आ र्थि क विवंचनेने मुळे है रा ण होती यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे. अभिनय क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्याच्या पूर्वी समंथाला आपल्या कुटुंबा च्या आर्थिक समस्यांमुळे पैसे कमवण्यासाठी छोटे-मोठी कामे आणि माँडेलिंगच्या असाईनमेंट कराव्या लागत होत्या.
समंथाला अगदी छोट्या-मोठ्या पार्ट टाइम जॉब ला सुद्धा स्वीकारावे लागत होते. यात काळात प्रसिद्ध कलादिग्दर्शक रविंद्रन यांची नजर समंथावर वर पडली व त्यांनी चित्रपट सृष्टी मध्ये समंथाला एंट्री मिळवून दिली यानंतर समंथाला तमिळ आणि तेलुगू भाषेतील अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या.
समंथा ही केवळ दिसायला सुंदर नसून ब्युटी विथ ब्रेनचे एक दुर्मिळ असे समीकरण असल्याचे तिला ओळखणाऱ्या लोकांकडून समजते ।आपल्या शालेय जीवनामध्ये समंथा वर्गातील हुशार मुलांपैकी एक मानली जात असे. समंथाला आपल्या अभिनय कारकिर्दीला सिद्ध करणारे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये 4 फिल्मफेअर पुरस्कारांचा सुद्धा सामावेश आहे
कुटुंबाची गुजराण करण्यासाठी पडेल ते काम करणाऱ्या समंथाला सध्या दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.समंथा आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी एक करोड इतके मानधन घेते. गाड्यांची समंथा ला प्रचंड आवड आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू ,जग्वार यांच्यासह अन्य काही गाड्यांचा ताफा आहे हैदराबाद मध्ये ती आपल्या कुटुंबासह एका आलिशान घरामध्ये राहते व या घराच्या सजावटीसाठी तिने प्रचंड मेहनत व खर्च केला आहे .
समंथाकडे महागड्या मेकअप किट आणि सौंदर्यप्रसाधनांचा ही मोठा साठा असतो. कधी काळी अतिशय ह ला खी च्या परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत केलेल्या समंथा ने आपले पूर्वीचे दिवस विसरले नाहीत यासाठी 2012 प्रत्युषा फाऊंडेशन या महिलांना वैद्यकीय मदत पुरवणा-या स्वयं सेवी संस्थेची स्थापना तिने केली.