करीना आणि शाहिद हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते,परंतु ‘या’ व्यक्तीमुळे झाले झाले ब्रेकअप…!

बॉलीवूडमधील बेबो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूर चे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आले आहे.सध्या करीना कपूर ही सैफ अली खानची पत्नी असून दोन मुलांची आई आहे.एक काळ असा होता जेव्हा करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.हे दोघे जण एकमेकांच्या बाबत खूपच गंभीर होते व तब्बल पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते.
या काळामध्ये दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम सुदधा केले.करीनाची आई बबिता कपूर व बहीण करिश्मा कपूर या दोघींनाही हे नाते फारसे पसंत नव्हते.करीना त्या काळामध्ये आपल्या प्रत्येक निर्मात्याला शाहीद ला तिचा नायक म्हणून घेण्याची मागणी करत असे हे बबीता ला आवडत नसे.यानंतर जेव्हा किस्मत कनेक्शन आणि टशन हे चित्रपट शाहिद कपूर आणि करिनाने साईन केले त्यानंतर या दोघांच्याही आवडीनिवडी बदलल्या.
टशनच्या चित्रीकरणादरम्यान करीना ला सैफ अली खान आवडू लागला व शाहिदचे नाव ही विद्या बालन सोबत जोडले जाऊ लागले.या कारणांवरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत व या वादांमध्ये करीना ची आई बबिता मध्यस्थी करत असे.अखेरीस या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला व करीनाने सैफ अली खान सोबत विवाह केला आणि शाहिद कपूर ने ही पुढे जात मीरा राजपूत सोबत आपला संसार थाटला.हे दोघेही सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी आहेत.