काय सांगता! ‘या’ कारणामुळे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांचे ब्रेकअप…!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा आणि प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघेही चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, मात्र आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. श्रद्धाच्या चाहत्यांसाठीही ही बातमी धक्क्यापेक्षा कमी नाही.
श्रद्धा-रोहनचे ब्रेकअप, एका रिपोर्टनुसार आता दोघांमधील अंतर खूप वाढले आहे. सध्या तरी या दोघांच्या ब्रेकअपचे कारण समोर आलेले नाही. ब्रेकअपबाबत आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, रोहनने गोव्यात आयोजित श्रद्धाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही हजेरी लावली नव्हती, जरी या काळात तो पूर्णपणे मोकळा होता. दाव्यानुसार, दोघांमध्ये जानेवारीपासून तणाव सुरू होता आणि फेब्रुवारीमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
मैत्री खूप वर्षांची आहे, श्रद्धा आणि रोहन लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांच्या कुटुंबातही चांगले संबंध आहेत. रोहन श्रद्धाच्या घरच्यांना खूप आवडत असल्याचं म्हटलं जातं. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, पण हे प्रेम शेवटपर्यंत पोहोचण्याआधीच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
श्रद्धाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तीने आपल्या करिअरमध्ये एबीसीडी 2, स्त्री, एक व्हिलन, आशिकी 2, छिछोरे यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती लवकरच लव रंजनच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय श्रद्धा लंडनमध्ये पंकज पाराशर यांच्या चालबाज चित्रपटातही दिसणार आहे.