कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ‘या’ कारणामुळे झाले ब्रेकअप…!

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक मानले जात होते. मात्र, या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या कधीच उघडपणे नाकारल्या नाहीत किंवा फेटाळल्या नाहीत. असे असूनही चाहत्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला. दरम्यान, त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांची निराशा केली आहे. अशा परिस्थितीत कियाराचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे.
अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, त्याच्या लॉन्चच्या वेळी अभिनेत्रीने अशी एक गोष्ट सांगितली जी सध्या चर्चेत आहे. एका पत्रकाराने कियारा अडवाणीला विचारले, ‘तुझ्या चित्रपटाचे नाव भूल भुलैया आहे, त्यामुळे तुला आयुष्यात कोणाला तरी विसरायचे आहे का?’ कियारा म्हणाली, ‘अजिबात नाही. माझ्या आयुष्यात मी ज्यांना भेटलो, ते माझ्या आयुष्याशी संबंधित आहे. मला कधीही कोणाला विसरायचे नाही. ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, कियाराचे हे वक्तव्य वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ सिद्धार्थ मल्होत्राशी जोडून पाहत आहेत.
अशा प्रकारे सुरू झाली प्रेमकहाणी, ‘शेरशाह’ चित्रपटादरम्यान कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात जवळीक वाढली. या चित्रपटातील दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली असून खऱ्या आयुष्यातही कियारा आणि सिद्धार्थला एकत्र पाहिल्यावर चाहते खूश आहेत. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते आणि आता अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सध्या, कियाराच्या आगामी ‘भूल भुलैया’ या चित्रपटाविषयी सांगायचे तर, या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे. हा चित्रपट आधी २०२१ ला रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे त्याची रिलीज डेट वाढवण्यात आली होती. त्याच वेळी, हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या अक्षय कुमरा स्टारर ‘भूल भुलैया’चा सीक्वल आहे.