गाढवाचे लग्न चित्रपटातील गंगी आता दिसते खूपच हॉट!

गाढवाचे लग्न चित्रपटातील गंगी आता दिसते खूपच हॉट!

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक विनोदी चित्रपटांची निर्मिती झाली आहे. आज पर्यंत दादा कोंडके ,अशोक सराफ ,मकरंद अनासपुरे ,लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे .मराठी चित्रपटसृष्टीतील काही विनोदी चित्रपट हे आज सुद्धा इतके लोकप्रिय आहेत की ते चाहते त्यांना वारंवार पाहतात. असाच एक चित्रपट म्हणजे गाढवाचं लग्न होय. गाढवाचं लग्न या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका होती.

या चित्रपटातील सर्वच पात्र प्रेक्षकांना खूप भावली होती. मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीची म्हणजेच गंगीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ला ही प्रेक्षकांनी खूप पसंत केले. ही भूमिका राजश्री लांडगे या अभिनेत्रीने साकारली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता मात्र इतक्या दिग्गज कलाकारांसोबत विनोदी भूमिका साकारताना त्या कुठेही डगमगल्या नाहीत व अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी या भूमिकेत समरसून काम केले.

मकरंद अनासपुरे यांच्या बरोबरीनेच गंगी ही भूमिका आज सुद्धा प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. जेव्हा हा चित्रपट टेलिव्हिजन वर लागतो तेव्हा गंगी काय करत असेल हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो. गंगी कुंभारीण अर्थातच राजश्री लांडगे ही अभिनेत्री सध्या अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत नाही मात्र गाढवाचं लग्न या चित्रपटानंतर त्यांनी सिटीझन या चित्रपटाची निर्मितीही केली होती व या चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केला होता. या चित्रपटात त्यांनी राजश्री पाटील शिर्के ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या चित्रपटाचे ही भरपूर कौतुक करण्यात आले होते.

या चित्रपटानंतर राजश्री कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसून आल्या नाहीत. सोशल मीडियावर राजश्री नेहमीच वेगळ्या अंदाजात दिसून येते.राजश्री या अतिशय बोल्ड अंदाजात प्रत्येक छायाचित्रात दिसून येतात .त्यांच्या छायाचित्रांना चहाते खूप पसंती सुद्धा दर्शवतात. गंगि या पात्र पेक्षा राजश्री चे वैयक्तिक आयुष्यातील कपडे व राहणीमान हे अतिशय आकर्षक व भिन्न आहे.

beingmarathi