गोविंदाची मुलगी दिसते इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, की फिकी पडते बॉलीवूड अभिनेत्रींची, फोटोज पाहून दंग व्हाल !

बॉलीवूड मध्ये विनोदी चित्रपटांचा ट्रेंड प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय करण्यामध्ये डेव्हिड धवन,गोविंदा ,कादर खान, या त्रिकुटाचा खूप मोठा वाटा आहे .एक काळ असा होता जेव्हा कुली नंबर वन, अनाडी नंबर वन अशा नंबर वन चित्रपटांच्या सिरीजने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.
गोविंदा असे रसायन होते जे नृत्य, अभिनय आणि विनोद या तिन्त्रहीनी भारलेले होते. यामुळे गोविंदाने कितीतरी पिढ्या चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले.गोविंदाची पुढची पिढी म्हणजे त्याची मुलगी टीना सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच अभिनयामध्ये आपले करिअर करण्यास उत्सुक आहे .टिना दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असून आपल्या फिटनेसची सुद्धा विशेष काळजी घेत असते.
टिनाने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यासाठी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.तीने फॅशन डिझाईन चे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतरच तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

आपल्या वडिलांचे चित्रपटसृष्टीतील इतके मोठे योगदान असून ,अगदी लहानपणापासून फिल्मी बॅकग्राऊंड असून सुद्धा टिनाला कोणत्याही बिग बॅनर चित्रपटांमधून पदार्पणाची संधी मिळाली नाही. टिनाने सेकंड हँड हजबंड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले व आज सुद्धा तिला तिच्या वडिलांच्या नावावर किंवा तिच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर कोणत्याही बिग बँनरचा व अभिनय कौशल्य ती दाखवू शकेल असा चित्रपट मिळू शकलेला नाही.

चित्रपट सृष्टी मध्ये काही अभिनेत्री या केवळ त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर अभिनय कौशल्य नसतानासुद्धा टिकून आहे मात्र टिनाकडे सौंदर्य भरभरून असूनही तिला अजून बॉलीवूड मध्ये स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
