जुबिन नौटियाल लवकरच अडकणार बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात…!

जुबिन नौटियाल लवकरच अडकणार बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात…!

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे असेच चित्र उभे राहिले आहे.काही महिन्यांपूर्वी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे एकमेकांसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर रणबीर कपूर व आलिया भट यांनी सुद्धा विवाहाची गाठ बांधली‌. आता अजून एक अभिनेत्री व यशस्वी गायक येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत.

हा गायक म्हणजेच बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये जिंदगी कुछ तो बता या गाण्यामुळे रातोरात सुपरस्टार झालेला जुबिन नौटियाल व कबीर सिंग या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेली अभिनेत्री निकिता दत्ता होय. निकिता दत्ता व जुबिन हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते.

जुबिनने आपल्या करिअरच्या सुरूवातीपासूनच एकापेक्षा एक अशी सुपरहिट गाणी रसिकांना दिली आहेत. तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु होत्या व यामध्येच निकिता दत्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर वैष्णोदेवी येथे गेल्याचे छायाचित्र शेअर केले. या छायाचित्रांमध्ये त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते व यावरूनच हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकले असल्याचा कयास बांधला जात आहे. या दोघांकडूनही अद्याप विवाहाच्या चर्चांना पुष्टी देण्यात आलेली नाही.

beingmarathi

Related articles