तलाक न घेताच ‘या’ अभिनेत्यांनी केले दुसरे लग्न, दोघांनी तर बदलला धर्म !

तलाक न घेताच ‘या’ अभिनेत्यांनी केले दुसरे लग्न, दोघांनी तर बदलला धर्म !

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची प्रेमवीरांची तयारी असते मात्र बॉलीवूड मध्ये अभिनेत्री व अभिनेता यांच्यामध्ये अशा प्रकारचे नातेसंबंध फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत.एकमेकां सोबत काम करतात माया नगरीमध्ये अनेक कलाकार एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडतात व यामध्ये कधीकधी काही विवाहित कलाकार आपल्या या पहिल्या नात्यातून विभक्त न होता दुसऱ्या विवाह बंधनात अडकतात. प्रेमासाठी काही कलाकारांनी आपला धर्म बदलला आहे. आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या पहिल्या विवाहातून घटस्फोट न घेता धर्म बदलून किंवा काही पळवाटा काढून दुसरा विवाह आपल्या सहकलाकारासोबत केला आहे.

धर्मेंद्र आणि हेमामालिनी ही जोडी ऐंशीच्या दशकामध्ये आघाडीची जोडी होती. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी अफलातून होती तितकीच जास्त केमेस्ट्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्य मध्ये सुद्धा होती  धर्मेंद्र यांचा अगोदरच प्रकाश  यांच्यासोबत विवाह झाला होता व त्यांना मुलंसुद्धा होती मात्र तरीही धर्मेंद्र हेमामालिनी यांच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते. या विवाहाला हेमामालिनी यांच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता व त्यांचा विवाह जितेंद्र यांच्यासोबत निश्चित करण्यात आला. यावेळी धर्मेंद्र यांनी धर्मांतर करून धर्म बदलला व हेमामालिनी यांच्या सोबत विवाह केला. हा विवाह करताना त्यांनी प्रकाश यांना घटस्फोट दिला नाही व आपल्या मुलांची जबाबदारी ही त्यांनी दूर केली नाही.हेमामालिनी धर्मेंद्र यांचा विवाह आजतागायत टिकला आहे व त्यांना एशा आणि आहना या दोन मुली सुद्धा आहेत.

स्मिता पाटील यांना आज सुद्धा अभिनयाची सम्राज्ञी मानले जाते.अभिनय आणि सौंदर्य यांचे अगदी दुर्मिळ असे दर्शन स्मिता पाटील यांच्या मध्ये घडत असते.स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्या सोबत विवाह केला होता. राज बब्बर यांचा त्याअगोदर विवाह झाला होता.  स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्या प्रेमाखातर आपल्या घरच्यांचा विरोधही पत्करला होता. मात्र या दोघांचा मुलगा प्रतीकच्या जन्माच्या वेळी काही आजारपण उद्भल्यामुळे स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला व त्यांच्या अकाली मृत्यूमुळे राजा राणी यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले.

ज्येष्ठ पटकथा लेखक व गीतकार सलीम खान अर्थातच सलमान खान यांचे वडील यांचे सुद्धा दोन वेळा विवाह झाले आहेत. सलीम खान यांनी कॅब्रे डान्सर हेलन यांच्यासोबत दुसरा विवाह केला होता. या विवाहाला सलीम यांच्या घरच्यांनीही स्वीकारले होते.

संजय खान आणि झिनत आमान यांची जोडी सुद्धा त्यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होती. संजय खान यांचे अगोदरच लग्न झाले होते तरी झिनतच्या प्रेमात वेडा होऊन त्याने झिनत अमान सोबत दुसरे लग्न केले आणि फक्त एक वर्ष भरातच विवाह संपुष्टात आला.ज्यावेळी झिनत अमानसोबत विवाह मोडला त्यावेळी संजय खानने अतिशय वाईट पद्धतीने झिनतला मारहाण सुद्धा केली होते ज्याचे व्रण कायम तिच्या चेहर्‍यावर राहिले.

नेहमीच चर्चेत राहणारे आघाडीचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट हे आपल्या चित्रपटांपेक्षा ही वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे नेहमी प्रसारमाध्यमांचे लक्ष राहिले आहेत. महेश भट्ट यांनी सुरुवातीला किरण यांच्यासोबत पहिला विवाह केला होता. किरण आणि महेश  यांना दोन मुले सुद्धा होती मात्र तरीही त्यांचे आपल्या सह अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते. परवीन बाबी आणि महेश भट्ट यांचे नातेसंबंध तर जगजाहीर होते मात्र काही काळानंतर परवीन बाबी नैराश्य मध्ये गेल्याने हे नाते मध्येच तुटले गेले. यानंतर महेश भट्ट यांच्या आयुष्यामध्ये सोनी राजदान आली. किरण यांच्याशी घटस्पोट न घेता महेश भट्ट यांनी धर्मांतर करून सोनी राजदान यांच्यासोबत दुसरा विवाह केला.

beingmarathi

Related articles