दृश्यम चित्रपटात ‘अजय देवगनच्या’ मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे ‘या’ सुपरस्टारची पत्नी, दिसतेय इतकी सुंदर आणि हॉट की, पहा फोटो..

बॉलीवूड मध्ये प्रेम कथा, ॲक्शन पट यांची काही विज्ञानावर आधारित कथानकांशी सांगड घालून वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार केले जातात. यासाठी हॉलिवूड कडून प्रेरणा घेतली जाते.हिंदी चित्रपटा मध्ये टारझन द वंडर कार हा चित्रपट काही वर्षांपूर्वी झळकला होता. यामध्ये एका गाडीशी निगडीत कथानक होते.
या चित्रपटामध्ये वत्सल शेठ हा नवोदित अभिनेता प्रमुख भूमिकेत होता याव्यतिरिक्त अजय देवगन, आयेशा टाकिया यांच्याही या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा सुपरहिट ठरला नाही मात्र या चित्रपटाने आयेशा टाकिया आणि वत्सल शेठ या अभिनेत्यांना बॉलिवूडमधील एंट्रीचा मार्ग सुकर करून दिला आहे .
वत्सल हा आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता. आज सुद्धा आपल्या फिटनेस मुळे व लुक्समुळे वत्सल तरूणींचा आवडता आहे. वत्सल शेठ ने मध्यंतरी टेलिव्हिजन वरिल आपली सहकलाकार इशिता दत्ता हिच्यासोबत विवाह केला व ही जोडी सोशल मीडियावर अतिशय ट्रेंडमध्ये आहे .

वत्सल शेठ ची पत्नी इशिता दत्ता ही नक्की कोण आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच होती. तर इशिता ही सुद्धा एक प्रसिद्ध टेलीव्हिजन आणि चित्रपट सृष्टी मध्ये आपला ठसा उमटवलेली अभिनेत्री आहे. इशिता ने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे व या चित्रपटांपैकी तिची खरी ओळख म्हणजे दृश्यम हा अतिशय गाजलेला चित्रपट होय. दृश्यम या चित्रपटांमध्ये इशिदा दत्तने अजय देवगन यांच्या मुलीची भूमिका खूपच प्रभावीपणे साकारली होती व या चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी ईशिता भविष्यात आघाडीची अभिनेत्री नक्कीच बनेल असे भाकीत सुद्धा केले होते.

इशिता अभिनेत्री तनुश्री दत्ता ची लहान बहीण आहे. इशिता ला टेलिव्हिजनवरील सिरीयल मध्ये खूपच कमी कालावधीत प्रमुख भूमिका मिळाल्या व टेलिव्हिजनचा मोठा चाहता वर्ग इशिता चा फँन झाला. स्टार प्लस वरील एक घर बनाऊंगा या मालिकेमध्ये सर्वात प्रथम इशिता दिसली होती. यानंतर बेपनाह प्यार है या मालिकेतील इशिता ची भूमिका सुद्धा खूप गाजली होती.झलक दिखला जा या डान्स रिऍलिटी शोमध्ये सुद्धा इशिता झळकली होती.

टारझन द वंडर कार या चित्रपटानंतर वत्सलला चांगल्या ऑफर्स न आल्यामुळे टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये त्याने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू ठेवली आहे तर इशिता सुद्धा आपले लक्ष आहे जास्त छोट्या पडद्यावरचे केंद्रित करत आहे. नुकताच ईशिता चा वाढदिवस साजरा केला गेला व यावेळी व वत्सलसोबतच्या तिच्या छायाचित्रांवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.