पलक तिवारी करते आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मूलाला डेट…!

पलक तिवारी करते आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मूलाला डेट…!

बॉलीवूडमधील मोठ्या कलाकारांप्रमाणेच त्यांची मुले सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.यामुळेच त्यांच्याशी निगडित सगळी माहिती अगदी इत्थंभूत पणे सर्वां पर्यंत पोहोचली जाते. बॉलिवूडमधील काही स्टार किड्स तर चाहत्यां मध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत व सोशल मीडियावर त्यांचे फॅन फॉलोइंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

अशाच स्टार किड्स पैकी एक म्हणजे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ची मुलगी पलक तिवारी होय. सध्या पलक तिवारी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे.श्वेता तिवारी ही अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे व फिटनेस मुळे नेहमीच चर्चेत असते. श्वेता प्रमाणे तिची मुलगी पलक सुद्धा सध्या तिच्या लुक्स मुळे खूप चर्चेत आहे.

ती सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शूट व व्हिडिओज शेअर करत असते. या सर्व छायाचित्र व व्हिडिओजला प्रेक्षकांकडून खूप पसंती सुद्धा मिळते. गेल्या काही दिवसांपासून पलकचे काही छायाचित्र व्हायरल होत आहेत. त्यामध्ये ती आपला चेहरा लपवताना दिसून येत आहे.

ही छायाचित्रे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सोबत पलक डिनर डेट वर गेली होती व यावेळी छायाचित्रकारांनी या दोघांना रेस्टॉरंट मधून बाहेर पडताना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.याप्रसंगी पलक घाईघाईने आपल्या कारमध्ये बसली व छायाचित्रकारां पासून वाचण्यासाठी ती दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवताना दिसून येत आहे.

पलकने आपला चेहरा का लपवला हे मात्र अद्यापही समजू शकले नाही.पलक आणि इब्राहिमच्या अशा रात्रीच्यावेळी रेस्टॉरंट मध्ये जाण्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे अशी चर्चा सध्या रंगत आहे .इब्राहिम अली खान व पलक तिवारी हे दोघेही स्टार किड्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

beingmarathi

Related articles