पुरुष का होतात दुस-यांच्या पत्नीवर फिदा, कारण वाचून चकित व्हाल!

घर की मुर्गी दाल बराबर ही म्हण आपण ऐकली असेल.काही वर्षानंतर पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती चे आकर्षण कमी झाल्यासारखे होते व बर्याच पुरुषांना आपल्या पत्नी पेक्षा दुसरी स्त्री किंवा दुसऱ्यांची पत्नी ही अधिक आकर्षक व सुंदर वाटू लागते. बहुतांश जोडप्यांमध्ये हा तिढा निर्माण होतो. प्रेम कधी कोणावर होऊ शकेल हे अतिशय क्लिष्ट कोडे आहे त्यामुळे कधी कोण कोणाकडे आकृष्ट होईल हे सांगता येणे कठीण आहे. पण जगभरातील बहुतांश पुरूष आपल्या पत्नी पेक्षा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात असे दिसून येते.असे परस्त्रीकडे आकर्षित होण्यामागची काही सर्वसाधारण कारणे नक्की काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत.
पुरुषांचा निसर्गदत्त स्वभावच असा असतो की त्यांना एकाच नात्यामध्ये दीर्घकाळ रमणे आवडत नाही.त्यांना लवकरच कोणत्याही नातेसंबंधांचा आणि विशेषतः वैवाहिक नात्याचा कंटाळा येऊ लागतो. काही वर्षे आपल्या पत्नीसोबत घालवल्या नंतर त्यांना आपल्या आयुष्यामध्ये वेगळा रोमांच आणि साहस हवे असते.लग्नाअगोदर पतीला पत्नी विषयी फारशी माहिती नसते त्यामुळे त्याला तिला अधिक जाणून घेण्या मध्ये रस असतो.
मात्र लग्नानंतर काही वर्षे सोबत घातल्यानंतर एकमेकांचे स्वभाव ,आवडी-निवडी व एकंदरीतच सर्व गोष्टी पतीला ज्ञात होतात व त्याचा आपल्या पत्नी विषयी अजून जाणून घेण्यातला रस संपून जातो. अशा वेळी दुसऱ्याची पत्नी किंवा एखादी परस्त्री त्याला अधिक उत्सुकता निर्माण करणारी वाटते कारण त्यांना तिच्याविषयी फारशी माहिती नसते. परस्त्रीला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे मध्ये तो रस घेऊ लागतो.
आपले आयुष्य कितीही सुखात आणि सहजपणे चालू असले तरीही आपल्याला दुसऱ्याचे आयुष्य आपल्यापेक्षा अधिक चांगले आहे असे नेहमीच वाटते. मग या गोष्टीला दुसऱ्यांच्या पत्नीचा अपवाद कसा असेल. पुरुषांना आपल्या पत्नी सोबत काही वाद विवाद अथवा कुरबुरी झाल्यास दुसऱ्यांची पत्नी किती चांगली आहे किंवा ती किती किती चांगल्या प्रकारे घर आणि अन्य बाबी सांभाळते असे वाटू लागते.मात्र ज्या स्त्रीमध्ये या पुरुषांना उत्सुकता असते ती स्त्री सुद्धा घरामध्ये आपल्या पतीसोबत कधी ना कधी तरी काही वाद हे निश्चितच करत असते व शक्यता अशी असते की त्या दुसऱ्या स्त्री च्य पतीला या पहिल्या पुरुषाची पत्नी अधिक चांगली वाटू शकते.
स्त्रियांना आपल्या पती सोबत वेळ घालवण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही. आपल्या पतीविषयी वाटत असलेली काळजी त्या व्यक्त करू शकत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामे मुले इत्यादीमुळे त्या नेहमीच व्यस्त राहतात. अशा वेळी पतीला आपल्या पत्नीला आपल्या मध्ये काही रस नसून ती आपली काळजी करत नाही किंवा तिला आपली गरज नाही अशी भावना निर्माण होऊन एकटेपणा वाटू लागतो. अशा वेळी दुसऱ्या स्त्रियांमध्ये आपली सहचारिणी शोधू लागतात. ज्या जोडप्यांमध्ये वादविवाद भांडणे नित्याचे असतात अशा जोडप्यांमध्ये पतीचे अन्य स्त्री कडे आकृष्ट होणे हे सर्वसाधारण असते.
स्त्रियांचे निरीक्षण करणे ही पुरुषांची जणू काही नैसर्गिक वृत्ती असते त्याला सहाजिकच कोणीही पुरुष अपवाद नाही त्यामुळे जेव्हा दुसऱ्या व्यक्तीची सुंदर पत्नी समोर येते तेव्हा निश्चितच पुरुष तिच्याकडे आकृष्ट झाल्याशिवाय राहात नाही व त्यामुळे आपली पत्नी किती सुंदर असेल तरी त्या वेळी त्यांना दुसऱ्याची पत्नी जास्त आकर्षक वाटते.