बाहुबली फेम प्रभास करणार ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न, नाव ऐकून व्हाल चकित…!

दक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील अभिनेत्यांची क्रेझ सध्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. या अभिनेत्यांच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. बाहुबली या चित्रपटानंतर प्रभास हा बाहुबली ची भूमिका करणा-या अभिनेत्या ला अमाप प्रसिद्धी मिळाली. प्रभासने या अगोदरही अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. प्रभासने राघवेंद्र या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
मात्र त्याला खरी ओळख बाहुबली चित्रपटानंतर मिळाली.या चित्रपटानंतर अनेक अभिनेत्रींना प्रभास सोबत काम करण्याची इच्छा असल्याचे दिसून आले.आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रभास खूपच गोपनीयता पाळताना दिसून येतो. प्रभास अजुनही अविवाहित आहे व त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा अनेक मुलींनी बोलून दाखवली. यामध्ये टॉलिवूडमधील काही अभिनेत्रींचा सुद्धा समावेश आहे.

यापैकी एक अभिनेत्री म्हणजे बाहुबली चित्रपटामध्ये प्रभास सोबत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी होय. अनुष्का शेट्टी व प्रभास हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सुद्धा वारंवार समोर येतात. प्रत्यक्ष आयुष्यात बाहुबली आपली देव सेना म्हणून नक्की कोणत्या मुलीला निवडतो हे येणारा काळच सांगेल.
