मलायकाचा ‘अर्जुन कपूर’ ला धक्का, मलायकाला पुन्हा व्हायचे खान कुटुंबाची सून!

मलायकाचा ‘अर्जुन कपूर’ ला धक्का, मलायकाला पुन्हा व्हायचे खान कुटुंबाची सून!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत राहात असते .कधी ती आपल्या लव स्टोरी मुळे चर्चेत असते तर कधी तिच्या ब्रेकप मुळे. नेहमीच काही ना  काही कारणामुळे मलायका चर्चेत राहात असते. नुकताच मलाएका चा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान व खान कुटुंबीयांविषयी मलायका बोलताना दिसत आहे.

हा व्हिडिओ कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमधील असून यामध्ये करण जोहरच्या प्रश्नावर ती अरबाज खान चे कुटुंबीय कसे होते याबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मलायकाने खान कुटुंबीयांच्या घरी पहिल्यांदा जेव्हा भेट दिली होती तेव्हा चा अनुभव सांगितला आहे. मलायकाने सांगितले की जेव्हा ती पहिल्यांदा अरबाजच्या घरी गेली तेव्हा सगळ्यांनी तिचे खूप आनंदाने स्वागत केले.

प्रत्येक जण तिला पाहून खुश होता. अरबाज चा लहान भाऊ सोहेल खान ला जेव्हा ती पहिल्यांदा भेटली तेव्हा तो डेनिम शॉर्ट घालून गॅलरीमध्ये सनबाथ घेत होता हे सगळे पाहून तिला जणू काही ती तिच्या घरीच आहे असे वाटले .खान कुटुंबीय खूप आधुनिक विचारसरणीचे आहेत त्यांनी माझ्यावर कधीही कोणत्या प्रकारचा दबाव आणला नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करण्याची मला सक्ती केली गेली नाही त्यामुळे मी माझे काम करू शकले असे मलायका सांगते‌.माझ्या कामाचे सर्वांनाच कौतुक होते इतकेच नव्हे  तर मलायकाने असे म्हटले की खान कुटुंबाची सून बनले हे माझे भाग्य होते व जर मला पुन्हा जन्म मिळाला व संधी मिळाली तर खान कुटुंबाचीच सून व्हायला मला आवडेल.

अरबाजच्या आई बद्दल बोलताना मलायकाने सांगितले की घरातील प्रत्येक सदस्याला  माझ्या कामाचे कौतुक होते अभिमान होता मात्र विशेष करून अरबाजच्या आईला म्हणजे माझ्या सासू ला माझ्या कामाबद्दल खूप आदर होता व त्या नेहमीच माझी तारीफ करत असत.

मलायका व अरबाज यांना एक मुलगा सुद्धा आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाले होते यामुळे त्यांनी 2017 साली एकमेकांपासून विभक्त होत घटस्फोट घेतला. त्यानंतर हे दोघे सुद्धा आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन झाले असून सध्या मलायका ही अर्जुन कपूरला डेट करत आहे.

beingmarathi

Related articles