‘या’अरबपती व्यावसायिकाची पत्नी चाहत्यांसोबत डेट वर जाण्याच्या बदल्यात करते ‘हे’ काम…!

‘या’अरबपती व्यावसायिकाची पत्नी चाहत्यांसोबत डेट वर जाण्याच्या बदल्यात करते ‘हे’ काम…!

सोशल मिडिया यावर सध्या अनेक चित्रविचित्र घटना निदर्शनास येतात. सोशल मिडिया वरील या घटनांच्या बाबतीत आपण कोणतेही तर्क लावू शकत नाही.अशीच एक घटना जर्मनीमध्ये घडली आहे.जर्मनी मधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या पत्नीने एका व्यक्ती सोबत डेटवर जाण्यासाठी अडीच लाख रूपये घेतले व‌ हा खुलासा तिने स्वतः केला आहे.

जर्मनी मध्ये ही घटना घडली आहे. जर्मनीमधील सौंदर्याच्या बाबतीत प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मेरिसोल योठ्ठा  हिच्या बाबत ही घटना घडली आहे.2021साली जर्मनी मधील प्रसिद्ध व्यावसायिक बेस्टियन योठ्ठासोबत मेरिसोलने विवाह केला आहे. मैरिसोलने नुकतेच आपल्या एका चाहत्या सोबत डेटवर गेले होते असे सांगितले आहे.

सोशल मीडियावर फोलोअर्सच्या बाबतीत ती व पती यांची एकमेकांशी स्पर्धा चालू आहे. मेरिसोल योट्टा आणि तिचा पती बॅस्टियन योट्टा यांनी सोशल मीडियावर कोणाचे सर्वाधिक फोलोअर्स आहे याबाबत स्पर्धा सुरू केली आहे व एका महिन्यामध्ये कोणाला सर्वाधिक जास्त उत्पन्न सोशल मीडियामधून मिळते याबाबतही स्पर्धा आहे म्हणूनच मेरिसोलने एका चाहत्यासोबत डेट वर जाण्याच्या बदल्यात अडीच लाख रुपये घेतले असे त्यांनी सांगितले. 

मेरिसोल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्राम वर साडेपाच लाखाहून अधिक फोलोअर्स आहेत. मेरीसोल तिच्या आकर्षक फिगरमुळे खूपच प्रसिद्ध आहे व तिची अनेक मादक छायाचित्रे ती शेअर करत असते ज्यामुळे चाहते अक्षरशः घायाळ होतात. मेरिसोल योट्टाचा पती अतिशय आलिशान आयुष्य जगण्यासाठी प्रसिद्ध आहे.

त्याची फिटनेस कंपनी असलेल्या कंपनीद्वारे ते वजन कमी करण्याची अत्याधुनिक यंत्रसामग्री तयार करतात. बेस्टियन योट्टाचे इंस्टाग्रामवर अकाऊंट असून या ठिकाणी तो आपल्या जीवनातील छायाचित्रे शेअर करत असतो. बेस्टियन योट्टाला आपल्या आलिशान राहणीमानामुळे जर्मनीतून अमेरिकेला जावे लागले.

कारण जर्मनीमध्ये त्याला त्याच्या इच्छेनुसार जगण्यावर बंधने येत होती असे वाटत होते. बेस्टियन असे सांगतो की जर्मनीमध्ये लोकांना त्याच्या आलिशान राहणीमानाबद्दल ईर्ष्या होत होती व म्हणूनच त्याच्या राहणीमानावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते म्हणून शेवटी तो अमेरिकेमध्ये स्थायिक झाला.

Rohini

Related articles