‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी खाल्लाय चक्क चात्यांकडून मार, एकीचे तर भर गर्दीत फाडले होते कपडे…!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी खाल्लाय चक्क चात्यांकडून मार, एकीचे तर भर गर्दीत फाडले होते कपडे…!

प्रसिद्धीची फार मोठी किंमत सेलिब्रेटींना मोजावी लागते. प्रसिद्धी आणि यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी काही गोष्टींशी तडजोड ही करावीच लागते. अशीच एक मोठी गोष्ट जी सेलिब्रिटींना नेहमी तडजोड करावी लागते ती म्हणजे त्यांचे खाजगी आयुष्य होय. प्रसार माध्यमे आणि चाहते हे सेलिब्रिटीच्या खाजगी आयुष्यामध्ये काय चालू आहे याची बित्तंबातमी बाळगून ठेवत असतात.

हे चाहते सेलिब्रिटीजवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीकधी हिंसेचासुदधा वापर करतात.चाहत्यांच्या या अतिरेकी प्रेमामुळे निश्चितच सेलिब्रिटींना धक्का बसतो. यातूनच आजकाल अनेक सेलिब्रिटी आपल्यासोबत अंगरक्षकांचे कडे बाळगून असतात जे भेदणे खूप अवघड असते. आज आपण अशाच काही सेलिब्रिटी बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी चाहत्यांच्या अतिरेकी प्रेमाचा हिंसेच्या स्वरूपात सामना केला आहे.

१) श्रुति हासन : श्रुति हासन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रुतीने आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केले आहे. श्रुतीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेला एक चाहता हा नेहमीच तिचा पाठलाग करत होता व एक दिवस भल्या सकाळी तिच्या घरी गेल्यावर  त्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र त्या वेळी घरामध्ये एकटीच असलेल्या श्रुतीने प्रसंगावधान राखत त्याचा प्रतिकार केला व त्याला पोलिसांच्या हवाली केले मात्र या प्रकाराने श्रुती चांगलीच भेदरली होती.

२) बिपाशा बसु : आपल्या मादक अदा आणि मोहक सौंदर्याने चाहत्यांना वेडा लावणाऱ्या बिपाशा बसु ला सुद्धा असेच एका प्रमोशनच्या कार्यक्रमाच्या वेळी चाहत्यांच्या हिंसेचा सामना करावा लागला होता.राज 3 या चित्रपटाच्या प्रमोशन च्या वेळेस अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात तिला पाहून गर्दी अगदी नियंत्रणाबाहेर गेली व या झटापटीत बिपाशाला दुखापत सुद्धा झाली व या गर्दीचा फायदा उठवत एका चाहत्याने तिचे स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला होता. या अश्या गैरवर्तनाने बिपाशा चांगलीच संतापली होती.

३) सलमान खान :आपल्याभोवती अंगरक्षकांची अभेद्य असे कडे नेहमीच बाळगणाऱ्या दबंग खान सलमाननं सुद्धा चाहत्यांच्या वेडेपणाचा अनुभव चांगला घेतला आहे आणि वाढदिवसाच्या पार्टी निमित्त एका ठिकाणी पोहोचलेल्या सलमान खानला अचानक कुठून तरी येऊन एका चाहत्याने मिठी मारली व त्याला किस करण्याचा प्रयत्न तो करू लागला. या सर्व प्रकाराने सलमान पुरता भांबावून गेला व आपल्या प्रतिकारासाठी त्याने त्याच्या चाहत्याच्या श्रीमुखात लगावली.

४) ह्रतिक रोशन : अतिशय हँडसम अभिनेता असलेल्या ह्रतिक रोशनला त तो स्टेजवर परफॉर्मन्स करताना एका चाहत्याने स्टेजवर जाऊन गळाभेट घेतली  व गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच मध्ये पडून आयोजकांनी त्याला अडवले.

५) जॉन अब्राहम : तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेल्या जाँन अब्राहम या अभिनेत्याला तर अगदी आयुष्यभर लक्षात राहील अशा एका विचित्र प्रसंगाला  सामोरे जावे लागले. मंगलोरला एका कार्यक्रमादरम्यान जाँन अब्राहमला एका चाहतीने करकचून चावा घेतला होता यामागचे कारण देताना तिने सांगितले की तिला त्याचा एक बाईट घ्यायचा होता.

beingmarathi

Related articles