‘या’ साऊथ अभिनेत्याचे वडील अजूनही बस ड्रायव्हरची नोकरी करतात!

‘या’ साऊथ अभिनेत्याचे वडील अजूनही बस ड्रायव्हरची नोकरी करतात!

काही वर्षांपूर्वी यश हे नाव परिचित नव्हते. मात्र केजीएफ या चित्रपटाच्या यशानंतर यशच्या चाहत्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने के जीएफ चाप्टर टू या चित्रपटाच्या पोस्टरला रिलीज करण्यात आले. यशच्या लोकप्रियतेचा अंदाज या गोष्टीवरूनच लावता येऊ शकतो की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो ट्विटरवर टॉप ट्रेंड मध्ये होता.

यशचे नाव या दिवशी एक नंबर वर होते. यशला इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. केजीएफ चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार असून यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. काही दिवसांपूर्वीच के जीएफ चाप्टर टू या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. 

युट्यूब वर हा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता व तो खूप वेगाने व्हायरल होत आहे.हा टीजर पाहून चाहत्यांना आपल्या लाडक्या रॉकी भाईला पुन्हा एकदा भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा टीजर आत्तापर्यंत 14.5 करोड इतक्यांदा पाहिला गेला आहे.

या चित्रपटामध्ये रॉकी भाई ची भूमिका साकारणारा अभिनेता यश हा कर्नाटक मधील हसन जिल्ह्याचा रहिवासी आहे. सुपरस्टार यश चे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. यश एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला असून त्याचे वडील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळामध्ये बस ड्रायव्हरची नोकरी करतात.

यश ने आपले शिक्षण म्हैसूर येथे पूर्ण केले मात्र त्याला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाच्या संधी मिळवण्यासाठी यश बेंगलोर मध्ये आला व येथे प्रसिद्ध बिनाका थेटर ग्रुपमध्ये तो सहभागी झाला.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये यश ने आपले वडील अजूनही बस ड्रायव्हरची नोकरी करतात असे सांगितले होते. के जीएफ चाप्टर टू च्या प्री रिलीज च्या वेळी निर्माता व दिग्दर्शक राजमौली यांनी असे म्हटले होते की यश चे वडील बस ड्रायव्हर आहे ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले व हे ऐकल्यानंतर यश पेक्षा सुद्धा मोठे स्टार ते आहेत असे मला वाटते.

केजीएफ या चित्रपटाच्या यशानंतर यश कन्नड फिल्म इंडस्ट्री मधला सुपरस्टार बनला व आज घडीला तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेत्यांपैकी एक आहे. केजीएफ च्या यशानंतर यश प्रत्येक चित्रपटासाठी 15 करोड रुपये इतके मानधन घेतो. कन्नड चित्रपटांमध्ये केजीएफ हा एकमेव चित्रपट आहे ज्याने दोनशे कोटींचा आकडा पार केला होता.

यशने अभिनेत्री राधिका पंडित सोबत विवाह केला आहे व आता या दोघांना दोन मुलेसुद्धा आहेत.हे दोघे एकमेकांना बरीच वर्षे डेट करत होते.2016 साली राधिका आणि यश यांनी अतिशय गुप्त पणे बंगलोर येथे विवाह केला.नंतर त्यांनी खूप मोठे रिसेप्शन देऊन आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले.

beingmarathi

Related articles