रेखा ‘या’ अभिनेत्याच्या नावाने सिंदूर लावते? खुद्द रेखाने केला याचा खुलासा!

रेखा ‘या’ अभिनेत्याच्या नावाने सिंदूर लावते? खुद्द रेखाने केला  याचा खुलासा!

भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये चिरतारुण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अभिनेत्री रेखा यांना ओळखले जाते. आज वयाच्या साठीच्या पुढे असूनही रेखा तितक्याच तरुण, सुंदर आणि फिट दिसतात. आज घडीच्या अभिनेत्रींनासुद्धा रेखा इतक्या तरुण कशा दिसतात याचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असते .प्रत्येक पिढीतील चाहत्यांना व अभिनेत्यांना सुद्धा रेखा ला पाहण्याची जाणून घेण्याची इच्छा असते. रेखा या सौंदर्याचे व बुद्धिमत्तेचे एक अनोखे मिश्रण आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक रहस्य सुद्धा चर्चेचा विषय ठरतात.

यापैकीच एक रहस्य म्हणजे आपला विवाह टिकवू न शकलेल्या व आज सध्या एकट्याच आयुष्य व्यतीत करणाऱ्या रेखा आपल्या भांगामध्ये जे ठसठशीत कुंकू लावतात ते कोणाच्या नावाचे लावतात हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात किंवा विवाह सोहळ्यामध्ये पारंपारिक वेशामध्ये दिसणाऱ्या रेखा यांच्या कपड्यां पेक्षा देखील जास्त लक्ष वेधून घेतले जाते त्यांच्या भागात भरलेल्या कुंकवाने. मात्र आजपर्यंत रेखा यांनी कधीही याबाबत स्पष्टपणे खुलासा केला नाही.

अभिनेत्री रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रेम कहाणीच्या बातम्यांना आज सुद्धा प्रसारमाध्यमांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन हे एकमेकांच्या प्रेमामध्ये अक्षरशः वेडे झाले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा जया बच्चन यांच्यासोबत विवाह झालेला होता व या विवाह पासून त्यांना दोन मुले सुद्धा होती.

आपल्या वैवाहिक आयुष्य मध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना रेखा यांनी अमिताभ यांच्या आयुष्यात एंट्री घेतली व त्यानंतर रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेम प्रकरणांच्या चर्चा चघळल्या जाऊ लागल्या. रेखा यांना समाजाची कुठल्याही प्रकारची भीती वाटत नव्हती व अमिताभ बच्चन यांनी समाजासमोर निदान त्यांच्या आणि अमिताभ मधील नात्याला कबूल करावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र अमिताभ बच्चन यांनी शेवटपर्यंत हे नाते उघडपणे कबूल केले नाही.

 अशावेळी इर्ष्येने पेटलेल्या रेखाने असे काही वर्तन उघडपणे केले ज्यामुळे सगळ्या जणांना आश्चर्याचा धक्का बसला. 1980 साली ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी विवाह केला. या विवाह सोहळ्याला रेखाला सुद्धा बोलवण्यात आले होते. यावेळी रेखा एखाद्या विवाहित स्त्रीप्रमाणे सर्व साज शृंगार करून आपल्या भांगात सिंदूर भरून या सोहळ्याला आली. यावेळी नवरदेव नवरी पेक्षाही जास्त चर्चेचा विषय रेखाच्या भांगात भरलेले कुंकू ठरला. यावेळी प्रसारमाध्यमांना व लोकांना एक नवीन चर्चेचा विषय मिळाला ते म्हणजे अमिताभ आणि रेखा यांनी विवाह केला व रेखा-अमिताभ च्या नावाचे कुंकू आपल्या भांगात भरत आहे.

या विवाह सोहळ्यातील रेखाची छायाचित्रे अनेक मासिकांनी छापली. मात्र रेखाने कधीही यावर अधिकृत असे वक्तव्य केले नाही. रेखा भरत असलेल्या सिंदूर बद्दल काही बॉलिवुडमधील व्यक्तींचे असे म्हणणे आहे की रेखा आणि अमिताभ यांनी विवाह केला नाही मात्र रेखा आपल्या व अमिताभच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सिंदूर लावते तर काहींच्या मते केवळ आपले सौंदर्य वाढवण्यासाठी रेखा शृंगार म्हणून सिंदूर लावते. 

रेखाचे वैयक्तिक आयुष्य हे लहानपणापासून एकाकी राहिले आहे. अगदी लहान वयातच त्यांचा पित्याचा आधार हरपला व यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या व ज्यांना त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवू इच्छित  होत्या त्या सर्वच व्यक्ती त्यांच्यापासून दुरावले गेल्या. रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले पण सर्वाधिक चर्चा झाली ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या नात्याची.

गेली 35 वर्षे रेखा आणि अमिताभ यांचे नाते हे गुढ बनून राहिले आहे. रेखा द अनटोल्ड स्टोरी या रेखा यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तकामध्ये रेखा आणि संजय दत्त यांच्या प्रेमसंबंध बद्दल यासिर उस्मान यांनी माहिती दिली आहे. मात्र हे संबंध सुद्धा अल्पावधीतच संपुष्टात आले. काही काळानंतर मुकेश अग्रवाल या व्यावसायिका सोबत रेखा यांनी विवाह केला. मात्र अवघ्या तीन महिन्यांमध्ये या दोघांनी घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रेखा यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मुकेश यांनी गळफास लावून आत्महत्या केली व यामध्ये चक्रावून टाकणारी गोष्ट अशी की मुकेश यांनी गळफास लावून घेण्यासाठी वापरलेली ओढणी रेखा यांची होती.अशा प्रकारे अनेक प्रेमसंबंधांमध्ये अडकूनही आज पर्यंत रेखा एकाकी आयुष्य जगत आहेत.काही चित्रपटांमध्ये आपले दर्शन देणाऱ्या रेखा बांद्रा येथील आपल्या निवासस्थानी राहतात व त्यांच्या पर्सनल सेक्रेटरी फरहान यांच्याशिवाय कोणालाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नसते.

beingmarathi

Related articles