वयाची तिशी ओलांडूनही ‘या’ ७ अभिनेत्री आहेत वैवाहिक सुखापासून वंचित, ६ आणि ७ नंबर ची अभिनेत्री तर खूपच हॉट तरीही…

वयाची तिशी ओलांडूनही ‘या’ ७ अभिनेत्री आहेत वैवाहिक सुखापासून वंचित, ६ आणि ७ नंबर ची अभिनेत्री तर खूपच हॉट तरीही…

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये योग्य वयात मुलगा आणि मुलगी यांचे विवाह लावून देणे खूप आवश्यक मानले जाते व म्हणूनच जेव्हा मुलीचे लग्नाचे वय ओसरत असते तेव्हा घरातल्या पेक्षा जास्त चिंता ही आजूबाजूच्या लोकांना व नातेवाईकांना भेडसावत असते. साधारण तिशीच्या पुढे जेव्हा एखादी मुलगी अविवाहित राहते तेव्हा तर सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर रोखलेल्या असतात मग भले ती मुलगी आपल्या करियरमध्ये व वैयक्तिक आयुष्यात कितीही स्वतंत्र आणि आत्मनिर्भर असेल.अन्य क्षेत्रांप्रमाणेच बॉलीवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रांमध्ये सुद्धा अनेक तारका आपले नशीब आजमावत असतात.आपल्या करिअरचा आलेख उंचावत असताना विवाह आणि ओघानेच येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मुळे आपले करिअर मागे पडेल या भीतीने किंवा कधीकधी स्वतंत्रपणे एकट्याने राहण्याची इच्छा असल्यामुळे अनेक अभिनेत्री या वयाची पस्तिशी ओलांडूनही स्वतंत्र आणि अविवाहितच राहणे पसंत करतात. या तारकांच्या आयुष्याबद्दल सर्वांनाच खूप उत्सुकता असते म्हणूनच आज अशा काही सुंदर आणि यशस्वी तारकां बद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी वयाची पस्तिशी ओलांडूनही विवाह केलेला नाही.

१) तब्बू : उंच ,लांब सडक केस,सडसडीत शरीरयष्टी आणि मोहक चेहरा यामुळे नव्वदच्या दशकात तब्बू या अभिनेत्रीने सर्वच चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. तब्बू केवळ दिसायला आकर्षक नसून तिच्या प्रायोगिक प्रकारात मोडू शकणा- या भूमिकांमुळे तिच्या अभिनयावर ही रसिक फिदा आहेत. तब्बू ने आतापर्यंत आपल्या अभिनय कारकिर्दीत सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी ताकदीने केल्या आहेत. या काळामध्ये तिचे नाव नागार्जुन सारख्या प्रसिद्ध व विवाहित दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील स्टार असलेल्या अभिनेत्यासोबत जोडले गेले होते. मात्र हे नाते विवाह बंधनात बांधणे शक्य झाले नाही .तब्बू आज वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा अविवाहित आहे व आपल्या अभिनयाची कारकीर्द तिने अजूनही चालूच ठेवली आहे.तिला आज सुद्धा तिच्या विवाह बद्दलच्या विचारांबद्दल चौकशी केली जाते या वेळी ती या प्रश्नाला हसून बगल देते व हा मुद्दा आता जुना झाला आहे असे सांगते.

२) साक्षी तन्वरः पडद्यावरील सर्वांची लाडकी सून अशी ओळख मिळवणारी कहानी घर घर की मधील पार्वती भाभी किंवा बडे अच्छे लगते है मधील प्रिया या दोन्ही भूमिकां मध्ये अगदी समरसून काम केलेल्या साक्षीने प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र विवाहबंधनात अडकण्यास अद्यापही आपण तयार नसल्याचे सांगितले आहे. साक्षी ही बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये सुद्धा झळकली आहे व आपल्या कामासाठी तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित सुद्धा केले गेले आहे. नुकतेच साक्षीने एका मुलीला दत्तक घेऊन तिच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली असून लग्नाचा आपला कोणताही विचार नसल्याचे तिने स्पष्ट केले.

३) मेघना मलिकः ना आना इस देस लाडो यांसारख्या मालिकांमध्ये अतिशय उत्कृष्ट असा अभिनय केलेल्या मेघना हिने वयाच्या 47 व्या वर्षापर्यंत ही आपल्याला मिस्टर राईट मिळाला नसल्याचे स्पष्ट करून आपण अविवाहित राहण्यास पसंत करत असल्याचे सांगितले आहे.

४) जया भट्टाचार्य : क्यू की सास भी कभी बहू थी या मालिकेमधून घराघरांमध्ये पोहोचलेल्या जया भट्टाचार्य या वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा अविवाहित असून आपले अविवाहित हे स्टेटस त्या एन्जॉय करतात असे त्या सांगतात.खूप वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या प्रियकरासोबत आपले ब्रेकअप झाले तेव्हा आपल्याच काही पुरुष मित्रांनी आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता या मधून आपल्या समाजात कोणतीही स्त्री ही एकटी आणि स्वतंत्र राहू शकत नाही हा जो समज रूढ झाला आहे त्याने मला धक्का बसला होता .मात्र मला समजून घेणारा चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेला असा असा पुरुष जर जोडीदार म्हणून मिळाला तर आणि तरच आपल्यालाही विवाह करण्याची तयारी आहे असे त्या सांगतात.

५) तनिशा मुखर्जीः ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची  मुलगी आणि बॉलीवुडची सर्वात अधिक प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्री काजोल ची लहान बहीण असलेली तनीषा मुखर्जी ही बॉलिवूडमधील एक परिचित नाव आहे. तनिषाने बॉलीवूड मध्ये निल अँड निकी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. मात्र तिच्या वाट्याला फारसे यश येऊ शकले नाही. काही मोजक्याच व यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमध्ये तनिषाने अभिनय केलेला आहे.बिग बॉस मधील एका सीझनमध्ये तनिषा सर्वाधिक प्रभावी स्पर्धकांपैकी एक होती व या नंतर तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. बिग बॉसच्या सीझनमध्ये तिचे अरमान कोहली या बिग बाँसच्या घरातील अन्य एका स्पर्धका सोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. मात्र हे संबंध बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अल्पावधीतच संपुष्टात आले. सध्या तनिषा बॉलिवुडमध्ये सक्रिय नसून कोणत्याही रिलेशनशिपमध्ये  नाहीये मात्र आपण अविवाहित आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारचे न्यून वाटत नाही असे ती सांगते.

६) सुष्मिति सेनः 1994 साली सुष्मिता सेनने विश्वसुंदरीचा किताब पटकावला.भारतीय सौंदर्य स्पर्धांच्या विश्वामध्ये विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ती एक प्रथम विश्व सुंदरी होती. यानंतर तिने आपले नशीब बॉलिवूडमध्ये आजमावले. काही निवडक चित्रपटांमध्ये सुश्मिताने काम केले व आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने आपले एक विशिष्ट असे स्थान बॉलीवुड मध्ये निर्माण केले. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने रिनी या मुलीला दत्तक घेतले व एक सिंगल मदर म्हणून तिचे संगोपन सुद्धा सुरू केले. त्यानंतर काही वर्षांनी तिने अलीसा या मुलीला ही दत्तक घेतले व सध्या आपल्या दोन्ही मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी ही अतिशय समर्थपणे सांभाळत आहे. या काळामध्ये तिचे नाव अनेक खेळाडू आणि अभिनेत्यांसोबत जोडले गेले.यामध्ये रणदीप हुडा,अनिल अंबानी,वसीम अक्रम यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र सुश्मिताने यापैकी कोणत्याही नात्याला अधिकृत पणे विवाहामध्ये परावर्तित केले नाही व ती अविवाहितच राहिली. आज वयाच्या बेचाळीसाव्या वर्षामध्ये सुष्मिता अविवाहित आणि स्वतंत्रपणे आपले आयुष्य जगत आहे.नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने हे स्पष्ट केले की आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ तीला तिच्या मुलींसोबत घालवायचा आहे व सध्या लग्न करण्यासाठी कोणताही मानस नाही असे ती सांगते.

७) नर्गिस फाखरीः मूळची अमेरिकन वंशाची असलेली नर्गीस फाखरी हिने आपल्या बॉलिवूडमधील पदार्पणाच्या पहिल्यावहिल्या रॉकस्टार या चित्रपटातून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या नंतर तिला अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळू शकले नाही व काही सहकलाकारांच्या भूमिका तिने ताकदीने निभावल्या मात्र आपल्या सौंदर्याने तिने फॅशन विश्वात खळबळ माजवून दिली. नर्गिस आणि उदय चोप्रा यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या मात्र नर्गिसने आपण पैसा व स्वतःला जगण्यासाठी आवश्यक तितके सुखसोयी स्वतःच्या बळावर मिळवण्यासाठी सक्षम आहोत त्यामुळे लग्न करण्याचा सध्या कोणताही विचार नाही असे सांगितले होते.

beingmarathi

Related articles