विवाह चित्रपटातील ‘ह्या’ गायब झालेल्या अभिनेत्रींचे उघडले रहस्य, आता दिसते खूपच हॉट

लाँकडाउनच्या या काळामध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्स ने गुड न्यूज दिली आहे व काही सेलिब्रिटी कपल्सला अपत्यप्राप्ती सुद्धा झाली आहे. या सेलिब्रिटी कपल्स मध्ये एका गोड चेहऱ्याच्या व निरागस सौंदर्याची मालकीण असलेल्या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश होतो. तिला नुकतीच पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे.
ही अभिनेत्री म्हणजे विवाह चित्रपटातील सोज्वळ पूनम ची भूमिका साकारणारी अमृता राव होय.अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी 2016साली विवाह केला .त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे .या गुड न्युज वर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अमृता राव ही आपल्या निरागस सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्ध होती व तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आपल्या कारकीर्दीत भूमिकाही केल्या मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती विवाह या चित्रपटाने .
राजश्री प्रॉडक्शन आणि सूरज बडजात्या यांनी केवळ आठ कोटी रुपये इतक्या कमी बजेटमध्ये बनवलेल्या विवाह या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपये इतका गल्ला मिळला व प्रेक्षकांचे प्रेम सुद्धा खूप मिळाले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चाहते आजही अगदी आवर्जून पाहतात.

अम्रुताने याअगोदरही काही यशस्वी चित्रपट आणि मोठ्या सह कलाकारांसोबत काम केलं आहे. यापैकी मै हूँ ना,जाँली एल एल बी 2,हे चित्रपट उल्लेखनीय आहेत.यानंतर अमृता राव यांनी टेलिव्हिजनवरील काही शोजमध्ये सुद्धा हजेरी लावली. विवाह या चित्रपटानंतर अमृता राव यांनी आर जे अनमोल सोबत विवाह केल्यावर ती चित्रपटसृष्टीपासून व अभिनयापासून दूर झाली.

यानंतर तिने कोणत्याही चित्रपटांमध्ये अभिनय केला नाही. मात्र तिच्या पतीसोबत सोशल मीडियावरील छायाचित्रांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. अमृता या छायाचित्रांमध्ये सुरुवाती पेक्षाही अधिक सुंदर दिसते.