व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अंकिता लोखंडे ने शेअर केले पतीसोबत रोमँटिक फोटो…

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अंकिता लोखंडे ने शेअर केले पतीसोबत रोमँटिक फोटो…

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या टेलिव्हिजन प्रमाणे बॉलिवूडमधील सुद्धा एक परिचित चेहरा बनली आहे.पवित्र रिश्ता या मालिकेतील भूमिकेमुळे घराघरांमध्ये पोहोचलेली अंकिता लोखंडे केवळ टेलिव्हिजन पुरतीच मर्यादित न राहता बॉलिवूडमध्येही तिने आपले स्थान बनवले आहे व आज घडीला तिने अनेक चित्रपटांमध्ये आपले दर्शनही दिले आहे.

टेलिव्हिजन वर पदार्पण करून तब्बल एक दशक उलटूनही आज सुद्धा अंकिता लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.नुकतेच अंकिता ने आपला प्रियकर विकी जैन सोबत विवाह केला आहे व या दोघांची छायाचित्रे आणि व्हिडिओज नेहमीच व्हायरल होताना दिसून येतात. अंकिताचे चाहते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत.

अंकिताने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपला पती विकी जैन सोबत ची काही छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये हे दोघेजण खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसून येत असून प्रेमाचा दिवस मानले जाणार्‍या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी या छायाचित्रांना खूप मोठ्या प्रमाणात लाईक केले गेले आहे.या छायाचित्रांमध्ये अंकिता व विकी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून ते समुद्रामध्ये एका जहाजावर दिसून येत आहेत.

या छायाचित्रांमध्ये या दोघांना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहून चाहत्यांनी त्यांना किसी की नजर ना लगे अशा कमेंट्स दिले आहेत. हे फोटोशूट अंकिता व विकी यांनी विवाह च्या अगोदर केले होते. हे फोटोशूट दुबईमध्ये करण्यात आले होते. आज सुद्धा विकी आणि अंकिता च्या लग्नाची छायाचित्रे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

Rohini

Related articles