शक्तिमान ची गीता विश्वास आता करते हे काम, पाहून धक्का बसेल!

टेलिव्हिजन वर अशा अनेक मालिका होऊन गेल्या आहेत ज्यांना आपण विसरू शकत नाही.यांपैकी एक मालिका म्हणजे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झालेली शक्तिमान ही मालिका होय. ही मालिका पाहणा-या चाहत्यांना ही मालिका किती शानदार होती हे नक्कीच माहिती आहे. 1997 साली ही मालिका प्रसारित होत असे. या मालिकेचे लाखो चाहते होते. या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका निभावणारे शक्तिमान आणि गीता विश्वास यांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले.
गीता विश्वास आणि शक्तिमान यांना लोक खूप पसंत करत होते. 2005 साली ही मालिका बंद पडली. आज सुद्धा या मालिकेचे चाहते युट्युब वर या मालिकेचे भाग पाहत असतात. गीता विश्वास हे पात्र या मालिकेमध्ये शक्तिमान वर खूप प्रेम करत असते.मात्र आपले प्रेम ती व्यक्त करू शकत नाही .गीता विश्वास हे पात्र साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
गीता विश्वास हे पात्र साकारणारी अभिनेत्री चे खरे नाव वैष्णवी महंत आहे. वैष्णवी चा लूक शक्तिमान मधील गीता विश्वासच्या लूकपेक्षा आता खूप बदलला असून ती टेलिव्हिजनवर आज सुद्धा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करताना दिसून येत आहे.सपने सुहाने लड़कपन के’, ‘मिले जब हम तुम’ या मालिकांमध्ये वैष्णवीला सर्वांनीच पाहिले आहे.
वैष्णवी ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये खूपच ग्लॅमरस आहे. तिने अनेक बोल्ड फोटोशूट सुद्धा केले आहेत जे चाहत्यांना खूपच आवडले आहेत.केवळ टेलिव्हिजनवरील मालिकाच नव्हे तर वैष्णवी ने काही चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे.
सध्या वैष्णवी ये उन दिनों की बात है या मालिकेमध्ये एक सहाय्यक भूमिका करताना दिसून येत आहे.सोशल मीडियावरही वैष्णवी आपली छायाचित्रे अपलोड करत असते व त्यांना चाहते भरभरून प्रतिक्रिया देतात.