शाहरुखच्या मुलीचे रात्री पार्टी करतानाची फोटो व्हायरल!

शाहरुखच्या मुलीचे रात्री पार्टी करतानाची फोटो  व्हायरल!

शाहरुख खान हा बॉलीवूडमधील सुपरस्टार आहे .शाहरुख खान आपल्या लोकप्रियतेमुळे व अभिनयामुळे केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशात सुद्धा लोकप्रिय आहे. वैयक्तिक आयुष्य मध्ये सुद्धा शाहरुख खान एक आदर्श पती आणि पिता म्हणून ओळखला जातो. शाहरुख ने गौरी सोबत विवाह केला आहे. या दोघांचा प्रेमविवाह आहे .या दोघांची लव्ह स्टोरी चित्रपटातील प्रेमकहाणी पेक्षा कमी नाही.

शाहरुख आणि गौरी यांना तीन मुलेसुद्धा आहेत.गौरी आणि शाहरुख च्या मुलांची नावे आर्यन ,सुहाना आणि अबराम अशी आहेत. शाहरुख खान हा श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत गणला जातो. शाहरुखच्या संपत्तीच्या मूल्य सध्या 8000 कोटीच्या आसपास असून गौरी खान चे संपत्तीचे मुल्य सुद्धा एक हजार कोटीच्या जवळपास आहे. गौरी आणि शाहरुख ची मुले ही यामुळे खूप ऐषोरामाचे आयुष्य जगतात .

गौरी आणि शाहरुखचा मुलगा व मुलगी आर्यन व सुहाना या दोघांनाही पार्टी करायला खूप आवडते.आर्यनला तर काही महिन्यांपूर्वी क्रूज वरील पार्टीमध्ये अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. सुहाना सुद्धा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत परदेशात खूप आलिशान अशा पार्ट्या करतांना छायाचित्रे व्हायरल होत आहेत.

सुहाना ही बॉलिवूडमधील सुपरस्टारची मुलगी आहे. यामुळेच ती नेहमीच चर्चेत असते. मध्यंतरी तिने आपल्याला सावळ्या रंगामुळे कशाप्रकारे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले याबद्दल खूप मोठी पोस्ट लिहिली होती. सुहाना आपले शिक्षण परदेशात पूर्ण करत असून ती नेहमीच आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत ची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते.काही दिवसांपूर्वी सुहाना ची आपल्या परदेशी मित्रांसोबत पार्टीची छायाचित्रे व्हायरल झाली. आर्यन खान ला अटक झाल्यानंतर त्याला जामीन मिळाल्यावर सुहानाने पहिल्यांदाच आपल्या मित्रांसोबत ही पार्टी केली होती.

beingmarathi

Related articles