संस्कारी अंगूरी भाभीने ‘पौरुषपूर’ वेबसिरीजमध्ये बोल्ड सिन देऊन केल्या सर्व मर्यादा पार…!

‘भाभी जी घर पर है’ हा कार्यक्रम टेलिव्हिजन वरील काही सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. या कार्यक्रमातील अंगूरी भाभी हे पात्र सर्वांनाच खूप आवडले होते.अंगूरी भाभी या पात्राची भूमिका निभावणा-या अभिनेत्रीला प्रत्यक्ष आयुष्यात तिच्या खऱ्या नावाने ही कुणी ओळखत नव्हते तर अंगूरी भाभी या नावाने तिला हाक मारली जाई. हे पात्र निभावणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिला आपल्या नावाने खरी ओळख ही बिग बॉस 11 च्या पर्वात मिळाली.
भाभी जी घर पर है या मालिकेमध्ये अतिशय संस्कारी आणि साध्या वेशात दिसणारी अंगूरी भाभी नुकतीच एका वेबसिरीज मध्ये दिसली व या वेबसीरीज मध्ये तिने अंगप्रदर्शनाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. तिच्या या अवताराने सर्वांनाच धक्का बसला आहे. पौरूषपछर ही वेब सिरीज एक पारंपारिक कथानकावर आधारित ड्रामा आहे.
या वेबसिरीज मध्ये एका अशा राजाची कथा आहे जो बाहेरख्याली व विलासी आहे. या राजाची पत्नी त्याच्यासाठी वेगवेगळ्या राण्या व दासी आणत असते. या वेबसीरिजमध्ये शिल्पा शिंदे व्यतिरिक्त मिलींद सोमण, अन्नू कपूर ,शाहीर शेख आणि पौलमी दास यांच्या सुद्धा प्रमुख भूमिका आहे.
भाभी जी घर पर है या मालिकेमध्ये अंगूरी भाभी चे पात्र खूपच संस्कारी पत्नी आणि सूनेचे दाखवले गेले होते.पौरूषपूर या वेब सिरीज मध्ये शिल्पा शिंदे हिने आपला लुक पूर्णपणे बदलला आहे. या वेब सिरीज मध्ये ती खूपच हॉट अवतारात दिसणार आहे.प्रेक्षकांना यामुळे आश्चर्याचा धक्काच बसला आहे.मात्र तिचा हा लूक सुद्धा चाहत्यांना आवडला आहे. या वेब सिरीज मध्ये तिने राणी मिरबाती हे पात्र साकारले आहे.

या पात्रासाठी शिल्पा शिंदे हिने खूप भारी दागिने व कपडे परिधान केले आहेत व या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असल्याचेही चाहत्यांचे मत आहे. या वेब सीरिजमध्ये शिल्पाने खूप सारे बोल्ड सीन सुद्धा दिलेले आहे. यासंदर्भात शिल्पाने प्रतिक्रिया व्यक्त करताना असे म्हटले आहे की ही एक विशिष्ट काळामधील कथा आहे व कथानकाच्या गरजेनुसार बोल्ड सीन चित्रीत करण्यात आले आहेत.

जर कथानकाची गरज असेल तर बोल्ड सीन चित्रीत करण्यास माझी काहीच हरकत नसते. यावेळी तिला काहीतरी वेगळा प्रयोग करायचा होता. त्यावेळी पौरुषपूरसाठी विचारणा करणारा फोन तिला आला. त्यावेळी तिला हि वेब सिरीज कामसूत्र व उत्सव या दोन चित्रपटांचे संमिश्र असेल असे सांगितले गेले होते. यावेळी तिची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती मात्र स्वतःवर मला विश्वास होता असेही ती म्हणते.