सारा अली खान आणि वरुण धवनच्या अंडरवाँटर किसने चाहत्यांचे उडवले होश, विडिओ तुफान वायरल…

सारा अली खान आणि वरुण धवनच्या अंडरवाँटर किसने चाहत्यांचे उडवले होश, विडिओ तुफान वायरल…

नव्वदच्या दशकामध्ये डेव्हिड धवन, गोविंदा आणि कादर खान यांनी आपल्या कॉमेडी चित्रपटाद्वारे चांगलीच धमाल उडवून दिली होती व प्रेक्षकांना हास्याची लयलूट करण्याचा अनुभव दिला होता ही परंपरा डेव्हिड धवन यांनी आजही पुढे चालवली आहे व आपल्या नव्वदच्या दशकामध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचे रिमेक ते बनवत आहेत.

या डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर संपूर्ण जगभरामध्ये त्यांचा कुली नंबर वन हा गोविंदा आणि करिश्मा कपूर या जोडीने धमाल उडवून दिलेला चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस रिमेकच्या स्वरूपात येत आहे. कुली नंबर वनच्या रिमेकमध्ये सारा अली खान आणि वरूण धवन ही प्रेक्षकांची आवडती जोडी दिसणार आहे.

वरूण धवन आणि सारा अली खान यांची ट्रेलर मध्ये दिसणारी ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.त्याचबरोबर सध्या सारा आणि वरूण यांचा पाण्याच्या खाली चित्रित केलेल्या एक अंडरवॉटर किसींग सीन चांगलाच व्हायरल होत आहे व यावर प्रेक्षकांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

वरुणने डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत या चित्रपटाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. वरूणने असे म्हटले की 2020 साल कोरोनामुळे संपूर्ण जगासाठी चिंतेचा व तणावाचा काळ आहे मात्र या काळामध्ये सुद्धा प्रेक्षकांना भरभरून हसण्यासाठी डिजिटल माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुली नंबर वन 25 डिसेंबरला रिलीज होत आहे तो नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

साराने हा चित्रपट म्हणजे आपल्याला जणू काही एक स्वप्नच वाटत आहे असे सांगितले .कारण हुस्न है सुहाना, तुझको मिरची लगी तो मै क्या करू या सारख्या गाण्यांना ऐकत मोठी झालेली सारा आता स्वतः या गाण्यांवर नृत्य करत आहे. इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग असल्याचे आपल्याला नक्कीच अभिमान आहे असेही तिने सांगितले. करिष्मा कपूर आणि गोविंदा यांनी या चित्रपटामध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयाला या चित्रपटामध्ये कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी निश्चितच होती.

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी अभिनय केलेल्या कुली नंबर वन या चित्रपटामध्ये करिश्माच्या लालची वडिलांची भूमिका कादर खान यांनी अतिशय उत्कृष्टपणे केली होती कुली नंबर वन चे रिमेकमध्ये कादर खान यांची वडिलांची भूमिका परेश रावल हे साकारत आहेत.

beingmarathi

Related articles